३५०० रुपयांपेक्षा जास्त किमतीत रेमडेसिवीर विकायचे नाही !

    दिनांक  14-Apr-2021 19:04:07
|

remdicivir_1  H
 

नवी दिल्ली : देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असतानाच आता केंद्र सरकारतर्फे महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात बऱ्याच भागात मनमानी चालवत रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री केली जात असल्याचे आणि काळाबाजार केला जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आता या इंजेक्शनची किंमत ही ३५०० रुपयांपेक्षा जास्त विकली जाणार नाही. नॅशनल फार्मासिटीकल प्रायसिंग ऑथोरीटी या संदर्भात नजर ठेवून असणार आहे.मंत्रालयाच्या मते, देशात एकूण सात रेमडेसिविर आहेत. या महिन्यात एकूण ३८.८० लाख इंजेक्शन तयार केले जाऊ शकतात. सहा आणखी कंपन्यांना या उत्पादनाच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यासाठी १० लाख इंजेक्शन दर महिना उत्पादन घेतले जाऊ शकते. देशात एकूण ३० लाखांचे दर महिना उत्पादन घेण्यासंदर्भातील लक्ष्य आता यापुढे ठेवण्यात आले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.