“काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात जाऊन चर्चा करावी”

    दिनांक  14-Apr-2021 13:41:38
|


mehbuba mufti_1 &nbsजम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींनी उधळली मुक्ताफळे


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती कुठल्याच ना कुठल्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. आणि यावेळी तर त्यांनी थेट भारताच्या पंतप्रधानांबाबत वक्तव्य केले आहे. “काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन चर्चा करावी,” अशी मुक्ताफळे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी मंगळवार, दि. १३ एप्रिल रोजी उधळली.
 
 
 
“काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन तेथील नेतृत्वासोबत चर्चा केली पाहिजे. त्याचप्रमाणे दोन्ही देशांनी काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून त्यासाठी शस्त्रांचा मार्ग सोडून देण्याची गरज आहे,” असेदेखील मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.
 
 
 
काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ पुन्हा बहाल करण्याची गरज असल्याचा जुनाच रागही मुफ्ती यांनी यावेळी आळवला. त्याचाप्रमाणे, “जम्मू - काश्मीरला पुन्हा जुना दर्जा प्राप्त झाल्याशिवाय काश्मिरी जनता गप्प बसणार नाही. ‘कलम ३७०’ संपुष्टात आणण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविषयी लडाख आणि काश्मीरची जनता नाखूश आहे,” असे मतसुद्धा मुफ्ती यांनी व्यक्त केले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.