"लसीचा पाहिला डोस ज्या ठिकाणी घेतला तिथेच दुसरा डोससुद्धा घ्यावा लागणार का ?"

14 Apr 2021 12:15:55


covid vaccination_1 



वाचा : कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्याविषयी राज्याचे आरोग्य मंत्रालय काय म्हणतेय..

मुंबई : महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी लसीकरणाची मोहीम अगदी वेगात सुरु आहे. सरकारने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार अगदी प्रत्येकाने आपापल्या घरातील वरिष्ठांचे लसीकरण करून घेतले असणार. परंतु आता कोरोना लसीचा पाहिला डोस एका ठिकाणी घेतल्यानंतर दुसरा डोस त्याच ठिकाणी जाऊन घ्यावा लागणार का ? या प्रश्नांबाबत आणि लसीकरणाच्या अन्य शंकांबाबत आरोग्य मंत्रालयाने खुलासा केला आहे.
 
 
 
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार लसीचा पहिला डोस कुठेही घेतला असला, तरी त्याच ठिकाणी दुसरा डोस घेण्याची आवश्यकता नाही. मात्र पहिल्यांदा ज्या कंपनीच्या लसीचा पहिला डोस घेतला, त्याच कंपनीचा दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आता पहिल्या कंपनीच्या लसीचा दुसरा डोस देशभरात कुठेही घेता येनार आहे.
 
 
 
नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असून दोन्ही डोस घेतले तरच या लसीचा फायदा मिळणार आहे. कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस ४ ते ६ आठवडे आणि कोवीशिल्डचा पहिला डोस घेतल्यावर ४ ते ८ आठवड्यामध्ये दुसरा डोस घ्यायचा आहे. कोवीन किंवा आरोग्य अॅपवर त्यासाठी पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे. तुम्ही पहिला डोस कुठल्या कंपनीचा घेतला आणि दुसरा डोस कुठल्या केंद्रावर उपलब्ध आहे तेथील वेळ या अॅपवरून मिळू शकणार आहे असाही खुलासादेखील आरोग्य मंत्रालयाने केला आहे.


Powered By Sangraha 9.0