शुभेच्छा द्याव्यात तर अशा! रणदीप हुड्डा मानलं तुम्हाला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2021
Total Views |
Hindu _1  H x W




मुंबई :
आज गुढीपाडवा म्हणजेच प्लवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४३ चा म्हणजेच नव्या वर्षाचा होतोय प्रारंभ. एरव्ही इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आघाडीवर असणाऱ्या कलाकारांपुढे धडाकेबाज अभिनेता रणदीप हुड्डा याने तरुणांना एका वेगळ्या व माहितीपूर्ण स्वरुपात हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रात साजरा केला जाणारा गुढीपाडवा हाच दिवस इतर राज्यांत कोणकोणत्या स्वरुपात साजरा केला जातो याची माहितीच रणदीप हुड्डा याने दिली आहे. आपल्या अभिनयाने मने जिंकणाऱ्या या अभिनेत्याने चाहत्यांची आजही मने जिंकून घेतली.
 
 
 
आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये तो म्हणतोय, "एक देश अनेक सण-उत्सव... देशात आज प्रत्येक जण एकमेकांना सदीच्छा देत आहे. आपल्या स्नेहपरीवारावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. बैसाखी, गुढीपाडवा, नवरात्री, उगाडी, बिहू, विशू, पुथांडू, जूरसिथाल, छेटीचांद, बोहंग, छेरीरोबा, नवरेह आणि पोईलाबोषाक आदी सणांचे हॅशटॅग शेअर करत त्याने हिंदू नववर्षाच्या आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
 
त्याच्या या अनोख्या अंदाजाला चाहत्यांनीही भरगोस प्रतिसाद दिला आहे. सोबत कुठला सण कुठे साजरा केला जातो याची माहितीही त्याने दिली आहे. महाराष्ट्रात गुढीपाडवा, आंध्र व कर्नाटकात उगाडी, पंजाबमध्ये बैसाखी, बंगालमध्ये नववर्ष, काश्मिरी पंडितांसाठी नवरेह, आसाममध्ये बिहू, मणिपूरमध्ये साजीबू नॉगमा पानबा छेरीरोबा, तमिळनाडूत पुथांडू, केरळमध्ये विशू, कोकणात सवंत्सर पर्व अशा सणांची माहितीही त्याने दिली आहे.
 
 


@@AUTHORINFO_V1@@