काॅंग्रेसचे तिकिट मिळवण्यासाठी या माणसाला करावे लागते खूश

13 Apr 2021 14:28:13
prashant kishor _1 &




अमृतसर -
पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी प्रशांत किशोर यांची प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. अशातच पंजाबमधील काॅंग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आत्मजीवनीमध्ये प्रशांत किशोर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. यामुळे पंजाबमध्ये निवडणूकीपूर्वी प्रशांत किशोर आणि पक्षाच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.
 
 
 
 
प्रशांत किशोर यांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पंजाब आणि उत्तर प्रदेश काॅंग्रेससाठी काम केले होते. आता ते पुन्हा येणाऱ्या पंजाब निवडणूकीमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांना सल्ले देणार आहेत. दरम्यान काही दिवसांपर्वी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पंजाब राज्य उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष कुमार कृष्ण कुमार बावा यांच्या 'संघर्ष के ४५ साल' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकामध्ये त्यांनी प्रशांत किशोर यांच्या पक्षातील लुडबुडीविषयी भाष्य केले आहे. पंजाबमध्ये काॅंग्रेसकडून निवडणूकीचे तिकीट मिळवण्यासाठी प्रशांत किशोर यांच्या गटाला खुश करावे लागते, असे पुस्तकात म्हटले आहे.
 
 
 
 
कृष्णा कुमार बावा यांनी आपल्या पुस्तकामध्ये काॅंग्रेसच्या अंतर्गत कामकाजाबाबत अनेक खुलासे केले आहेत. बावा यांनी आपल्या पुस्तकात निवडणूक रणनीतिज्ञ प्रशांत किशोर कोणत्या मार्गांनी कार्य करतात यावर प्रकाश टाकला आहे. त्यांनी सांगितले की, काॅंग्रेसमध्ये सभ्यतेने वागणे पाप आहे. बरेच लोक जे काॅंग्रेसच्या विचारसरणीशीही जोडलेले नाहीत, ते प्रशांत किशोर यांच्या गटाला खुश करुन येथे तिकिटे घेतात. २०१७ मध्ये बावा यांच्या बाबतही असेच काहीसे घडले. जिथे आधी त्यांना लुधियाना पूर्व मधून निवडणूकीच्या रिंगणात उतरवले जाईल अशी चर्चा होती. मात्र, त्यानंतर त्यांचे तिकीट कापण्यात आले.

Powered By Sangraha 9.0