मुंबई सलग चौथ्यांदा नाईट रायडर्सला हरवणार का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2021
Total Views |

IPL_1  H x W: 0
 
 
चेन्नई : मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमावल्यानंतर स्पर्धेत पहिला विजय मिळवण्यासाठी रोहितचघ संघ आतुर असेल. तर, दुसरीकडे इयान मोर्गनचा कोलकाता नाई रायडर्स हा आपल्या विजयाची लय राखण्यास तयार असणार आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडीयममध्ये होणाऱ्या आयपीएलच्या पाचव्या सामन्यामध्ये मुंबईच्या संघात अनेक बदल पहायला मिळू शकतात. तसेच, दुसरीकडे कोलकात्यामध्ये नितीश राणाला पहिल्याच सामन्यात सूर गवसला असून राहुल त्रिपाठीनेदेखील त्याला चांगली साथ दिली आहे. त्यामुळे हा सामाना अटीतटीचा होणार हे निश्चित.
 
 
 
मुंबईकडून दक्षिण आफ्रिकेचा डीकॉक सलामी करताना दिसेल, तर पियुष चावलालादेखील या सामन्यात मुंबईकडून खेळवण्यात येऊ शकते. दोन्ही संघाचा इतिहास पाहता मुंबईने अनेकदा कोलकातावर मात केली आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये आयपीएलचे एकूण २७ सामने झाले. यातील फक्त सहाच सामन्यांत कोलकाता संघ विजेता ठरला. मुंबईने २१ सामन्यांत विजयाची नोंद केलेली आहे. त्यामुळे आता हीच विजयाची लय कायम ठेवण्याचा मुंबई संघाचा प्रयत्न असेल. तसेच, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा हा कोलकाता संघाविरुद्ध सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. त्याच्या नावे या संघाविरुद्ध सर्वाधिक ९३९ धावांची नोंद आहे.
 
 

@@AUTHORINFO_V1@@