भन्नाट ऑफर : लसीकरण पूर्ण करा आणि मिळवा जास्त व्याजदर !

13 Apr 2021 14:19:45

Vaccine _1  H x


नवी दिल्ली : कोरोनाच्या लाटेने देशात डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यावेळी आपल्याकडे लसीकरण हे एक शस्त्र आहे. त्यासाठी देशभरात 'टीका उत्सव' साजरा केला जात आहे. कोरोना लसीकरणाबद्दल अद्यापही अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. हे दूर करण्यासाठी आता बँका पुढे आल्या आहेत. 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'तर्फे एक आकर्षक ऑफर बाजारात आणण्यात आली आहे. ज्यात मुदत ठेवींवर (FD) जादा व्याज मिळणार आहे. लसीकरण करणाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी काय कराल वाचा सविस्तर...
 
 
काय आहे ऑफर ?
 
सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे एका मुदत ठेव योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचे नाव 'इम्यून इंडिया डिपॉजिट', असे आहे. या योजनेत मुदत ठेव ठेवल्यानंतर सुरू असलेल्या व्याजदरावर ०.२५ टक्के पाव टक्का व्याज जास्त मिळणार आहे.
 
 
कुणाला मिळणार फायदा ?
 
ज्या लोकांनी लसीकरण पूर्ण केले आहे त्या सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के म्हणजे अर्था टक्का जास्तीचा लाभ मिळणार आहे. मात्र, तुम्ही लसीकरण पूर्ण केले नसेल तर याचा फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही.
 
 
ऑफर कधी पर्यंत राहणार सुरू ?
 
बँकेने ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. या योजनेचा मुदत ठेव कालावधी ही १,१११ दिवस असणार आहे. काही काळासाठीच ही ऑफर वैध असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना या मुदत ठेवीवर अर्धा टक्क्याने जास्त व्याजदर मिळणार आहे. कोरोना लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे.
 
 
सेंट्रल बँकेचे व्याजदर नेमके किती आहेत?
 
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे सध्या सात ते १० वर्षांपर्यतचे व्याजदर लागू आहेत. यात बँक २.७५ टक्के ते ५.१ टक्क्यांपर्यंत व्याज देते.
 

अवधि व्याज दर (टक्के)
 
७-१४ दिवस २.७५
 
१५-३० दिवस २.९०
 
३१-४५ दिवस २.९०
 
४६-५९ दिवस ३.२५
 
६०-९० दिवस ३.२५
 
९१-१७९ दिवस ३.९०
 
१८०-२७० दिवस ४.२५
 
२७१-३६४ दिवस ४.२५
 
१ वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी ४.९०
 
२ वर्षांपेक्षा जास्त आणि ३ वर्षांपेक्षा कमी ५.००
 
३ वर्षांपेक्षा जास्त आणि ५ वर्षांपेक्षा कमी ५.१०
 
५ वर्षांपेक्षा जास्त आणि १० वर्षांपेक्षा कमी ५.१०
 

 
Powered By Sangraha 9.0