'अदानी समुह' आणि 'फ्लिपकार्ट'मध्ये नेमका काय करार झाला ?

    दिनांक  12-Apr-2021 16:25:29
|

adani _1  H x W
 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत हा प्रयोग महत्वाचा

मुंबई : 'वॉलमार्ट'ची स्वामीत्व असलेल्या 'फ्लिपकार्ट' या ई-कॉमर्स कंपनीने अदानी समुहाशी करार केला आहे. समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ही घोषणा केली होती. AdaniConneX एक नवीन टायर-४ केंद्र निर्मिती केली जाणार आहे. लॉजिस्टिक्सच्या व्यवसायात अग्रस्थानी असलेल्या अदानी लॉजिस्टिक्सतर्फे एकूण ५ लाख ३४ हजार चौरस फुटांचे केंद्र तयार केले जाणार आहे. यामुळे मुंबईत अडीच हजार प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील, अशी आशा कंपनीला आहे.
 
 
 
 
फ्लिपकार्टतर्फेही या कराराला दुजोरा देण्यात आला आहे. त्याद्वारे कंपनीच्या वितरण साखळीला एक गती मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. वाढत्या ग्राहकवर्गाला उत्तम सुविधा देण्यासाठी याचा फायदा होईल, असेही फ्लिपकार्टतर्फे सांगण्यात आले आहे. देशाच्या पश्चिमेकडील भागात ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढता दबदबा पाहता अदानींनी फ्लिपकार्टला हे फुलफिलमेंट केंद्र भाडेतत्वावर दिले आहे. लघु उद्योग आणि हजारो विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या केंद्राची मदत होणार आहे.
 
 
 
२०२१ या वर्षातील तिसऱ्या किंवा चौथ्या तिमाहीत हे केंद्र सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. हजारो विक्रेत्यांकडून आलेल्या एकूण १ कोटी उत्पादनांची साठवणूक व विक्री प्रक्रीया करण्याची क्षमता या केंद्राची असणार आहे. एमएसएमी आणि विक्रेत्यांना याचा लाभ होणार असल्याचा विश्वास दोन्ही कंपन्यांनी व्यक्त केला आहे. फ्लिपकार्टतर्फे या केंद्राद्वारे एकूण अडीच हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. अदानींशी झालेल्या या कराराचा फायदा घेत फ्लिपकार्टने चेन्नई येथे आपले तिसरे केंद्र सुरू केले आहे.
 
 
 
 
‘अडानी पोर्ट्स अॅण्ड स्पेशल इकोनॉमिक झोन (APSEZ) या कंपनीचे सीईओ करण अदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात सर्वात गतीने वाढत जाणाऱ्या कंपन्यांनी केलेली भागीदारी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. हेच 'आत्मनिर्भर भारत' अभियानाचे एक उदाहरण आहे. नव्याने उभारण्यात येणारे एक केंद्र आहे ज्यात फ्लिपकार्ड या कंपनीच्या डिजिटल आणि वास्तववादी गरजा पूर्ण होणार आहेत. यामुळे एक तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून समृद्धता येईल.
 
 
 
एमएसएमई क्षेत्रातील उद्योजक व व्यापारी यांच्यातील ऑनलाईन दुवा म्हणून हे केंद्र महत्वाचे आहे. फ्लिपकार्टचे CEO कल्याण कृष्णमूर्ति म्हणाले आहेत की, भारतात इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होण्यासाठी अदानी समुहाचा हातभार आहे. लॉजिस्टिक्स, रियल ईस्टेट, ग्रीन एनर्जी आणि डाटा सेंटर, या उद्योगात उतरून एक उदाहरण निर्माण केले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.