Photo : मुंबई-अहमदाबाद मार्गावर 'वीकएण्ड लॉकडाऊन'चा प्रभाव

    दिनांक  11-Apr-2021 16:51:37
|
ahemdabad _2  Hखानिवडे (वार्ताहर) : वीकएण्ड लॉकडाऊनचा परिणाम सतत व्यस्त राहणाऱ्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर दिसून आला. रविवारी सकाळपासून शुकशुकाट होता. कधीतरी एखाद दुसरे वाहन या मार्गावरून दिसून आले.
ahemdabad _4  H


अगदी तुरळक वाहने महामार्गावरून जात असल्याने वर्षाच्या टाळेबंदीनंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती शनिवार आणि रविवारी दिसून आली. एरव्ही गजबजलेला टोलनाका दोन दिवस सुना सुना पडला आहे.
ahemdabad _3  H 
 
वसई पूर्वेतून जाणारा व देशाच्या सुवर्ण चतुष्कोन चा एक हिस्सा असणारा मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा वाहनांच्या गमनाने अत्यंत गजबजलेला असून दिवसरात्र बेसुमार वाहनांची वर्दळ या महामार्गावरून होते.
ahemdabad _1  H


सहा पदरी महामार्गावरून मिनिटाला कमीत कमी अंदाजे ४० ते १५० पेक्षा जास्त वाहने धावतात. मात्र, महामर्गावर लॉकडाऊनचा चांगलाच परिणाम दिसून आला. जेमतेम मिनिटाला चार ते पाच वाहने जात होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.