किरण, एक लढवैय्या ; अनुपम खेर यांची भावनिक पोस्ट

    दिनांक  01-Apr-2021 14:41:41
|

Anupam Kher_1  
 
 
 
मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आणि भाजप चंडीगडच्या खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याची घोषणा भाजपने केली. यानंतर आता त्यांचे पती अनुपम खेर यांनीदेखील एक भावनिक पोस्ट करून याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. 'किरण एक लढवैय्या व्यक्ती आहे. ती आजारावर नक्की मात करेल.' अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
 
 
 
 
 
अनुपम खेर यांनी ट्विट केले आहे की, "मी आणि सिकंदर हे सांगू इच्छितो की, किरण मल्टीपल मायलोमा एक प्रकारच्या ब्लड कॅन्सरने पीडित आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, ती आधीपेक्षा अधिक खंबीर बनून या आजारातून बाहेर येईल. आम्ही नशीबवान आहोत की, उत्तम डॉक्टरांची टीम किरणवर उपचार करते आहे. ती लढवैय्या आहे आणि या संकटालाही ती परतवून लावेल. किरण खेर जे काही करते ते मनापासून करते. तिचे हृदय प्रेमाने भरलेले आहे. म्हणूनच लोक तिच्यावर इतके प्रेम करतात. ती ठीक आहे आणि बरी होत आहे. तुमच्या प्रेम आणि पाठींब्यासाठी आभार."
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.