"त्या कळव्याच्या खाडीत, नक्की दडलेय काय?"

09 Mar 2021 18:48:58

Poonam Mahajan_1 &nb
 
 
मुंबई : एकीकडे भाजपने मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सत्ताधारी पक्षाला कात्रीत पकडले असताना आता भाजप खासदार पूनम महाजन यांनीदेखील ट्विटकरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अद्यापही महाविकास आघाडीकडून सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. यावर आता पूनम महाजन यांनीदेखील ट्विट करत, "कुणी तरी, कधी लोकांना, स्कॉर्पियोची खरी गोष्ट सांगेल काय? त्या कळव्याच्या खाडीत, नक्की दडलेय काय?" असा प्रश्न विचारला आहे.
 
 
 
 
 
 
 
मंगळवारी विधानसभेमध्ये मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण चांगलेच गाजले. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आता महाराष्ट्र राज्याचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडे शंकेची सुई वळली आहे. हिरेन यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये वाझे यांनी आपल्या पतीला मारले असल्याचे आरोप केले आहेत. यावरून मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांच्या पत्नीचा जबाब वाचून दाखवला. "एवढे पुरावे असतानाही सरकार सचिन वाझेंवर कारवाई का करत नाही?" असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला.
 
 
  
कोण आहे अंबानींच्या घराखाली पीपीई किटमध्ये दिसणारा मिस्ट्रीमॅन? 
 
 
Powered By Sangraha 9.0