९ कोटी रोजगार देणारी गिग अर्थव्यवस्था नेमकी आहे तरी काय ?

    दिनांक  31-Mar-2021 19:41:47
|

News _1  H x W:
 
नवी दिल्ली : जर तुम्ही तात्पुरत्या कामाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी ठरणार आहे. एका अहवालानुसार, एकूण नऊ कोटी नोकऱ्या तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याला गिग इकॉनॉमी म्हटले जाते. नियमित कामापेक्षा काही कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना तिथे ठेवले जाते. मात्र, या कामाची सोय थेट सरकार करत नाही तर त्यासाठी परिसंस्था उभ्या करते. पर्यटन, उत्पादन, बांधकाम व्यवसाय आणि सेवा क्षेत्रात अशाप्रकारचे रोजगार तयार होतात.
 
 
कोरोनानंतर आली गती
 
कोरोनानंतर अशाप्रकारच्या नोकऱ्यांमध्ये कंपन्यांनी ऑफर सुरू केली आहे. देशातील मोठी म्युच्युअल फंड कंपनी निप्पोन असेट मॅनेजमेंट गेल्या वर्षापासूनच या प्रकारची व्यवस्था केली आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा दिली आहेच. सोबतच अन्य कुठल्याही ठिकाणी त्यांना काम करण्याची गरज असेल तर तिथेही ते काम करू शकतात.
 
 
बीसीजी समुहाचा अहवाल
 
बोस्टन कंसल्टिंग ग्रुप (BCG) ने एका अहवालात या नोकऱ्या एकूण जीडीपीच्या तुलनेत १.२५ टक्क्यांवर वाढ करू शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे. गिग अर्थव्यवस्था ही काही नवी संकल्पना नाही. कायमस्वरुपी नोकऱ्यांचा विचार जेव्हा केला जातो. त्यावेळी अस्थायी स्वरुपातील नोकऱ्यांवरही भर देण्याचा विचार कुठलेही सरकार करत असते.
 
 
नऊ कोटी नोकऱ्या तयार कशा होणार ?
 
जर पुन्हा लॉकडाऊन लागला नाही तर कुशल, अकुशल आणि तात्पुरत्या सेवा देणाऱ्या क्षेत्रात एकूण ३.५ कोटी रोजगार निर्माण होऊ शकतात. या अहवालानुसार, अस्थायी स्वरुपातील नोकऱ्या या बांधकाम क्षेत्र, उत्पादन, परिवाहन आणि लॉजिस्टीक व वैयक्तिक सेवा क्षेत्रातही होऊ शकतात.
 

कुठल्या क्षेत्रात किती रोजगार ? 
 
BCG च्या अनुमानासंदर्भात विभिन्न क्षेत्रातील रोजगारांचा अभ्यास केला आहे. या संदर्भात सहाशेहून अधिक शहरी भागातील कुटूंबांचे सर्वेक्षण केले होते. तसेच उद्योग विशेषज्ञ आणि उद्योगपतींचेही मते जाणून घेण्यात आली आहे. २५० अब्ज डॉलर्सची उलाढाल होण्याची शक्यता आहे. या अहवालात ५- लाख रोजगार सेवा क्षेत्रात निर्माण होऊ शकतात. यात वाहतूक व्यवस्था, फॅसिलीटी मॅनेजमेंट, अकाऊंट्स या स्वरुपातील असतील. १.२ कोटी रोजगार हे हाऊसहोल्ड डिमांडवर आधारित असतील. ३.७ कोटी रोजगार हे अकुशल कामगारांसाठी तयार होतील.
 
२-३ वर्षांत १० लाख नवे रोजगार
 
गिग इकोनॉमी अंतर्गत भविष्यात २ ते ३ वर्षांत दहा लाख नवे रोजगार तयार होतील. गिग वर्कर हे मुळात युवा वर्गातील असतात. एका दिवसात काही तास काम करण्याची गरज असते. घरखर्चासाठी दुसऱ्या प्रकारच्या रोजगाराची सोय ते करतात. भारतासारख्या देशात या रोजगारांचे महत्व आहे. सरकारतर्फेही अशा रोजगारांसाठी वेगळा विचार व्हायला हवा, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.