मुख्यमंत्री विरोधकांना काय उत्तर देणार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2021
Total Views |

uddhav thackeray_1 &

राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस


मुंबई :
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली आहे. अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणीवस यांनी अनेक मुद्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वीजदर वाढ, मराठा आरक्षण, महिला सुरक्षा, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास या प्रकरणावरून फडणवीस यांनी सभागृह दणाणून सोडले होते. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार आहेत.


विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपची निदर्शने


अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. तत्पूर्वी विविध मुद्द्यांवरून विधिमंडळाच्या सभागृहाबाहेर विरोधकांनी निदर्शने करायला सुरुवात केली आहे. भाजप नेते शेतकरी नुकसान भरपाई मुद्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे.महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप आमदार यावेळी उपस्थित होते.


आज अर्णब गोस्वामींना विधिमंडळ समिती समोर हजर रहावे लागणार


रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केल्याप्रकरणी विधिमंडळात त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याप्रकरणी अर्णब गोस्वामी याना आज विधिमंडळ संमितीसमोर हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आले आहे. त्यानुसार अर्णब यांना आज विधिमंडळ समितीसमोर हजर रहावे लागणार आहे.यापूर्वीही त्यांना हजर राहण्याबाबत सांगण्यात आले होते मात्र ते गैरहजर होते त्यामुळे आज ते हजर राहतात की नाही त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

@@AUTHORINFO_V1@@