राठोड अद्यापही तांत्रिकदृष्ट्या मंत्रीपदावर कारण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2021
Total Views |

Sanjay Rathod_1 &nbs



मुंबई : बीडच्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणाशी वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप करत भाजपाने राजीनामा घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. अधिवेशन चालू न देण्याचा इशारा भाजपाने दिला होता. त्यांनंतर राठोड यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. मात्र, हा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे अजूनही दिला नसल्याने भाजप नेत्यानी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत म्हटले की राजीनामा फ्रेम करून ठेवण्यास दिला आहे.
 
 
 
पूजा चव्हाण प्रकरणावरून विरोधकांकडून कोडीं होण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले खरे. मात्र, वनमंत्र्यांच्यापाठी असलेल्या बंजारा समाजाला मुख्यमंत्री नाराज करू इच्छित नाही त्यामुळे, त्यांनी मंत्र्यांचा राजीनामा राज्यपालांना अद्याप पाठवलेले नाही, असा आरोप भाजपने केला आहे.
संजय राठोड हे आजही राज्याचे वनमंत्रीच आहेत. कारण जोपर्यंत राज्यपालांकडून त्यांचा राजीनामा मंजूर होत नाही, तोपर्यंत त्यांचं मंत्रीपद कायम आहे, असा या गोष्टीचा अर्थ होतो.
 
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जे सांगितले की, "त्यांचा राजीनामा मी काय फ्रेम करुन ठेवणार आहे का, ते आता बघावं लागेल. अधिवेशनादरम्यान हा वेळकाढूपणा तर चालू नाही ना, नाहीतर शेवटच्या दिवशी त्यांचा राजीनामा घेणार नाहीत, असंही होऊ शकतं. त्यामुळे हे सगळ राजीनाम्याचे नाटक सुरू आहे. आणि या नाटकाचा हा पहिला की दुसरा अंक आहे हे माहीत नाही, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
 
 
 
"संजय राठोड अजूनही मुख्यमंत्र्यांच्या हृदयात आहेत. राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांच्या खिशात (बहुदा फ्रेम करायला दिला असावा). राठोडने बंगला, गाडी सोडलेली नाही. राजीनामा राज्यपालांकडे कधी पाठवणार? उद्धवजी खेळ पुरे, आता तरी न्याय करा, राठोडला अटक करा.
 
 
- अतुल भातखलकर ,भाजप आमदार व भाजप नेते.




@@AUTHORINFO_V1@@