'या' शिवसेना नेत्याचा डीएनए तपासा : प्रवीण दरेकर

    दिनांक  03-Mar-2021 16:10:51
|

pravin darekr_1 &nbsमुंबई : मुंबईतील मागाठाणेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. प्रकाश सुर्वे हे आपले जैविक वडील असल्याचा दावा राज कोरडे या युवकानं काही महिन्यांपूर्वी कोर्टात केला आहे.यावर आज विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात आवाज उठवत त्यांची देखील चौकशी करा आणि मुलाला न्याय द्या अशी मागणी केली आहे.


राज नामक मुलाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून प्रकाश सुर्वेंच्या डीएनए चाचणीची मागणी केली आहे. हायकोर्टात याचिका दाखल करण्यापूर्वी आमदार सुर्वे यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप राज कोरडेने केला. तसंच जीवे मारण्याची धमकीही दिल्याचं त्याने म्हटलं आहे.या मुलाचं पालकत्व आमदार प्रकाश सुर्वे यांनी स्वीकारावं, अशी मागणी राज कोरडेच्या आईनं देखील केली आहे.यावर आज सभागृहात प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते यांनी आवाज उठवला.संजय राठोड हे प्रकरण ताज असताना सरकारचा दुसरा एक प्रतिनिधी शुद्ध अडकला आहे. राज या मुलाने एक आमदार लोकप्रतिनिधीची डीएनए टेस्ट करा अशी मागणी कोर्टात दाखल केली आहे .तो मुलगा एकाएकी गायब झाला. त्या मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न होत आहे.या सगळ्या प्रकरणाची चौकशी यएसआयटी मार्फत करावी अशी मागणी आहे.या प्रकरणातील मुलाला आणि आईला संरक्षण द्या अशी मागणी आम्ही करत आहोत. तसेच या डीएनए चाचणीची अगोदर मागणी आम्ही करत आहोत असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

या अगोदर असं कधी घडलं होत


उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी आपले वडील असल्याचा दावा रोहित शेखर या युवकाने दावा केला होता. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर तिवारी यांची डीएनए चाचणी झाली आणि रोहित हा तिवारी यांचा जैविक पुत्र असल्याचं सिद्ध झालं. अखेर तिवारी यांनाही ते मान्य करावं लागलं होतं. हा सर्व प्रकार आपली राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी सुरु असल्याचा दावा सु्र्वेंनी केला आहे. हे विरोधकांचं कारस्थान असल्याचा आरोपही आमदार सुर्वे यांनी केला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.