दि कल्याण जनता सहकारी बॅकेच्या अध्यक्षपदी सचिन आंबेकर तर उपाध्यक्षपदी डॉ. रत्नाकर फाटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2021
Total Views |
kalyan janta bank_1 
 
 

पंचवार्षिक निवडणूकीत जनता पॅनल भरघोस मतांनी विजयी

 
कल्याण : 'दि कल्याण जनता बॅके'च्या अध्यक्षपदी सचिन सुधाकर आंबेकर आणि उपाध्यक्षपदी डॉ. रत्नाकर नारायण फाटक यांची निवड केली आहे. 'दि कल्याण जनता सहकारी बॅके'च्या संचालक मंडळांची पंचवार्षिक निवडणूक २८ फेब्रुवारीला पार पडली. २ मार्चला या निवडणूकीचा निकाल घोषित करण्यात आला. त्यामध्ये जनता पॅनलचे सर्व उमदेवार या निवडणूकीत भरघोस मतांनी विजयी झाले. खुल्या प्रवर्गातील १२ उमेदवार सगळे निवडून आले.
 
 
दोन महिला आणि एक राखीव जागा यांची बिनविरोध करण्यात आली. पुढील पाच वर्षांसाठी निवडून आलेल्या नव्या संचालक मंडळांची पहिली सभा आज बॅकेच्या मुख्यालय कल्याण वास्तूत पार पडली. या सभेत सर्व संचालकांनी बॅकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड केली. सुमारे पाच हजार कोटींचा एकत्रित व्यवसाय असणाऱ्या कल्याण जनता सहकारी बॅकेच्या ४२ शाखा आहेत. सुरूवातीपासूनच बॅक नफ्यात व्यवसाय करीत आहे.
 
 
नवनियुक्त सचिन आंबेकर हे डोंबिवली परिसरातील प्रथितयश लेखा परीक्षक असून २००७ पासून बॅकेचे तज्ज्ञ संचालक म्हणून कार्यरत आहेत. नवनियुक्त उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर फाटक हे २०१५ पासून बॅकेचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. बॅकेचे नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर फाटक हे कल्याण परिसरात सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. बॅकेचे ज्येष्ठ संचालक आणि मावळते अध्यक्ष अॅड. सुरेश पटवर्धन म्हणाले, "बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष सचिन आंबेकर आणि उपाध्यक्ष रत्नाकर फाटक यांच्या नेतृत्वाखाली बँक अधिक वेगाने पुढे जाईल. ग्राहकहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. बँकेच्या भागधारकांनी जनता पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले."
 
 
यांच्या गळ्यात पडली विजयाची माळ
 
 
'दि. कल्याण जनता बँके'चे नवनिर्वाचित संचालक सचिन आंबेकर, रत्नाकर फाटक, सुरेश पटवर्धन, मधुसुदन पाटील, हेमंत दरगोडे, पद्यनाभ जोशी, डॉ. संदीप जाधव, मिलिंद नाईक, पंकज दांडेकर, मंगेश पाटील, शशिकांत आंधले, मकरंद केळकर, संपदा कुलकर्णी, वैदेही दप्तरकर, यशवंत पांगारकर
 
 
अशी झाली लढत!
 
 
नव्याने निवडून आलेल्या जनता पॅनलमधील संचालकांना सरासरी ५ हजार मते मिळाली आहेत. या निवडणूकीत जनता पॅनलच्या सुरेश पटवर्धन ५१८०, मधुसुदन पाटील ५१२९, हेमंत दरगोडे ५००७, पद्मनाभ जोशी ५१२९, रत्नाकर फाटक ४९४६, डॉ. संदीप जाधव ५१५४, सचिन आंबेकर ५१८८, मकरंद केळकर ५१८७, मंगेश पाटील ५०९२, यशवंत पांगारकर ४९८०, शशिकांत आंधले ५१३२ अशी मते पडली आहेत. जनता पॅनलचे मिलिंद नाईक, अॅड. संपदा कुलकर्णी, प्रा. वैदेही दफ्तरदार हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय जनता पॅनलच्या विरोधात उभे असलेल्या श्रीराम पॅनलपैकी विश्वास जोशी ६१४, अक्षय पटवर्धन ४९०, भास्कर भावसार ३४७, अरूण शिंपी ३१६, सुभाष संन्याशी २४९ यांना मते मिळाली आहेत.


@@AUTHORINFO_V1@@