मुलींना पोलीसांनी कपडे काढून नाचायला लावले! राज्यभरात संताप

    दिनांक  03-Mar-2021 13:22:20
|

jalgaon_1  H xजळगाव :
जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकाराचा व्हिडीओदेखील तयार करण्यात आल्याचे कळते आहे. यप्रकरणी तात्काळ कारवाई करावी यामागणीसाठी भाजपने विधानसभेत आक्रमक पवित्र घेतला.महिला आणि बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार आणि अन्याय, अत्याचार झालेल्या महिला आणि मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी अनेक उघड झाल्या आहेत. त्यात जननायक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे यांनी वसतिगृह गाठून महिला आणि मुलींना भेटून माहिती जाणून घेतली असता, एक मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरील पुरुषांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार समोर आला. हा धक्कादायक प्रकार समोर येताच याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात पाहायला मिळाले.


विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकारावरून महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, राज्यात महिला असुरक्षित आहेत. वस्तीगृहात महिलांसोबाबत तसेच तरुणींसोबत अनेक गैरप्रकार घडत आहेत. जळगावची घटना ही फार दुर्दैवी आहे. या प्रकरणात त्वरित कारवाईचे आदेश द्यायला हवेत."

भाजप नेते व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेवर विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "ही घटना घडून तीन दिवस झाले आहेत. तरीही अद्याप कारवाई नाही. प्रशासनाला सरकार सांगते कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप काही कारवाई नाही, कारवाई कधी करणार ? आहात वसतिगृहातले हे गैरप्रकार कधी थांबणार आहेत असं बोलत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.मात्र हे असंच सुरु राहिल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगिलते. आई बहिणी सुरक्षित नाही, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच कोणीही यातून वाचणार नाही राज्यात ही घटना घडली. याबद्दल चिंता व्यक्त केली आणि सभागृहात आलेल्या मागणीनुसार चौकशी करून कारवाईचे आदेश आम्ही दिले आहेत असे म्हटले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.