...तर आयकर विभाग ठोठावणार 'या' कलाकारांचेही दार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2021
Total Views |

Phantom_1  H x
 
 
 
'फँटम' कंपनीला सुरुवातीपासूनच वादाची जोड होती. आता या कंपनीच्या संबधित असलेल्या निर्माता, दिग्दर्शकांच्या घरावर छापे पडण्याचे सत्र सुरु झाले आहे...
 
 
साधारण २०११मध्ये 'फँटम फिल्म' नावाची कंपनी बॉलीवूडमधील ४ मित्रांनी स्थापन केली. अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, विकास बहल आणि मधू मंटेना या चार निर्माता दिग्दर्शक मित्रांचे हे एक स्वप्न होते. या चित्रपट निर्मिती संस्थेखाली अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती झाली आहे. मात्र, आयकर विभागाने 'फँटम फिल्म'संबधित असणाऱ्या अभिनेत्री तापसी पन्नू, निर्माता अनुराग कश्यप, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या घरावर धाडी पडल्या आहेत. वेळेवर प्राप्तीकर न भरणे आणि प्राप्तीकर चोरी या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता भविष्यात अनेक बडे चेहरे अडकणार असल्याचे चित्र दिसत आहे. 
 
 
२०११ला सुरुवात...
 
 
२०११मध्ये या चार मित्रांनी या कंपनीची सुरुवात केल्यानंतर २०१३मध्ये या फिल्म प्रोडक्शनमध्ये त्यांचा पहिला चित्रपट विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित 'लुटेरा' प्रदर्शित केला. ओ हेन्री यांच्या 'लास्ट लीफ' या लघुकथेवर आधारित या चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिंह यांची महत्त्वाची भूमिका निभावली होती. 'फँटम फिल्म'च्या नावाखाली प्रदर्शित केलेल्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला पण बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. तरीही, या फिल्मची सुरुवात मात्र साधारणच झाली होती.
 
 
पुढे त्यांनी कारण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'सोबत 'हसी तो फसी' या चित्रपटाची निर्मिती केली. मात्र, हा चित्रपट सपशेल आपटला. पुढे 'फँटम फिल्म'ला ओळख मिळवून देणारे दोन महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित झाले. २०१४मध्ये विकास बहल दिग्दर्शित आणि कंगना रानौत अभिनित 'क्वीन' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ठरला. यानंतर 'फँटम फिल्म'ने अनेक अशा वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची निर्मिती केली. 'अगली' (२०१४), अनुष्का शर्माच्या प्रोडक्शनसोबत केलेला 'एनएच-१०' (२०१५) हे चित्रपट चांगलेच गाजले. तसेच, 'हंटर' आणि  'बॉम्बे वेल्वेट' सारखे धाडसी चित्रपटांची निर्मिती केली.
 
 
'मसान' चित्रपटाने दिली वेगळी ओळख
 
 
'मसान' हा तसा 'फँटम फिल्म'चा चौथा चित्रपट. या चित्रपटाने देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहवाही मिळवली. 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली. यानंतर 'शानदार', 'उडता पंजाब', 'रमण राघव' सारख्या चित्रपटाची निर्मिती केली. 'ट्रॅप्ड', सुपर ३०, 'भावेश जोशी सुपरहिरो', 'मनमर्झिया' या अनोख्या चित्रपटांची निर्मिती केली. वेब सिरीजच्या क्षेत्राला फँटम फिल्मचे मोठे योगदान आहे. कारण हॉररपट 'घोल' आणि चित्तथरारक 'सेक्रेड गेम्स'ने तरुणाईला अक्षरशः वेड लावले.
 
 
'फँटम फिल्म' आणि वाद
 
 
प्रसिद्धीच्या शिखरावर असताना कंपनीसंबधित अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. या कंपनीतील महत्त्वाचा दुवा असलेला अनुराग कश्यप हा नेहमीच कुठल्याना कुठल्या वादात अडकत होताच. शिवाय 'मी टू' मोहीन सुरु झाल्यानंतर ‘क्वीन’ चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल याच्यावर एका तरुणीने छेडछाडीचा आरोप केला होता. त्यानंतर या चौघांमध्ये मतभेद झाले आणि 'फँटम फिल्म'ला कायमचे बंद करण्यात आले. २०१८मध्ये अनुराग कश्यपने अधिकृतरित्या याबाबत घोषणा केली. तरीही आता पुन्हा एकदा ही कंपनी चर्चेत आली, ती म्हणजे कर चोरीचे आरोप लागल्यामुळे. अनुराग कश्यप, विकास बहल व मधू मंटेना यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली. त्यामुळे आता आणखी किती नावे यामध्ये येणार हे येत्या काळात कळेलच.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@