पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे समाधान औताडेंना उमेदवारी

29 Mar 2021 15:08:32

Samadhan Autade_1 &n





पंढरपूर :
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक भाजपातर्फे समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची घोषणा भाजप महाराष्ट्रचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. समाधान औताडे पाच वर्षांपासून भाजपमध्ये सक्रीय आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदविका प्राप्त समाधान औताडे हे बांधकाम, इन्फ्रास्ट्रक्चर आणि साखर निर्मिती उद्योगात कार्यरत आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पहात आहेत.
 
 
 
औताडे कुटूंबीय मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील समाजजीवनात अनेक वर्षांपासून सक्रीय आहेत औताडे सोलापूर येथील 'विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'चे संचालक असून 'सोलापूर जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशन'चे अध्यक्षही आहेत.सोलापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांशी ते संबंधित आहेत.
 
 
 
मंगळवेढा तालुक्यात औताडे यांनी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आरोग्य, वैद्यकीय तसेच रोजगार शिबीरांचे आयोजन केले आहे. लॉकडाऊन काळात औताडे यांनी विविध माध्यमातून गरजू समाजघटकांना साह्य केले आहे. या बरोबरच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विद्यार्थ्यांना साहाय्य करण्यासाठीही औताडे विविध उपक्रमांचे आयोजन सातत्याने करीत असतात.






Powered By Sangraha 9.0