रविवार, दि. २८ मार्च ते शनिवार, ३ एप्रिल २०२१ चे राशिभविष्य

    दिनांक  27-Mar-2021 21:36:41
|

nn  _1  H x W:


मेष : षड्रिपूंचे दहन करावे
 
 
काम क्रोधादी षड्रिपूंचे दहन होळी पौर्णिमेनिमित्त करावे. धनस्थानी मंगळ, राहू असल्याने आर्थिक बाबतीत जागरूक राहावे. धनचिंता राहील. जामीन कोणास राहू नका. यांत्रिक क्षेत्रात, विधी क्षेत्रात अनुकूलता राहील. कौटुंबिक जीवनात सामंजस्याने राहावे. कलेतून अर्थार्जन घडेल. महिलांनी स्वमताग्रह टाळावा. विद्यार्थ्यांना धनचिंता राहील.
 
वृषभ : सामंजस्याने राहावे
 
 
राशीतील, मंगळ, राहू शारीरिक तक्रारी वाढविणार आहेत. सरकारी कामे मनासारखी होतील. कौटुंबिक जीवनात सामंजस्याने राहावे. धार्मिक, सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. कार्यक्षेत्रात प्रगतीची पावले पडतील. चिकाटीने केलेली वाटचाल चांगली यशस्वी होईल. महिलांना मानसिक त्रास संभवतो. विद्यार्थ्यांना नव्या संधी.
 
मिथुन : कार्यक्षेत्रात अनुकूलता
 
 
कर्मस्थ रवि-बुधामुळे कार्यक्षेत्रात अनुकूलता वाढेल. आर्थिक व्यवहार विचाराने करावे. खर्चाचे प्रसंग वाढणार आहेत. डोळ्यांच्या तक्रारींची दखल घ्यावी. आठवा शनि सध्या प्रतिकूल आहे. नव्या योजना विचाराने स्वीकाराव्यात. समस्यांतून मार्ग काढावा लागेल. कलेत प्रगती होईल. महिलांना खर्चाचे प्रसंग वाढतील, विद्यार्थ्यांना समस्या.
 
कर्क : सौख्याच्या घटना
 
कार्यस्थानातील रवि-बुध अनुकूल फलदायी आहेत. खाद्यपदार्थ दैनंदिन वापराच्या वस्तू, वस्त्र प्रावरणे अशा व्यवहारात अनुकूलता वाढेल. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार या सप्ताहात करून घ्यावेत. कौटुंबिक जीवनात सौख्याच्या घटना घडतील, अपेक्षित कामे होतील. सुसंधी लाभतील. महिलांना गृहसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना प्रगतीच्या संधी लाभतील.
 

सिंह : अपेक्षित संधी लाभतील
 
कर्मस्थ मंगळ राहूमुळे कार्यक्षेत्रात समस्या संभवतात. प्रगतीची चाके सध्या मंदावणार आहेत. कर्तव्य कामे करीत राहावीत. नव्या योजना विचाराने स्वीकाराव्यात. धसाडेपणा टाळावा. अपेक्षित संधी लाभतील. स्पर्धामध्ये यश मिळेल, कलागुणांचा विकास होत जाईल. दूरचे प्रवास टाळावेत. महिलांना अस्वास्थ्य राहील. दगदग टाळावी. विद्यार्थ्यांना अडचणी राहतील.
 
कन्या : चिकाटीने प्रगती
 
आर्थिक स्थितीत चिकाटीने प्रगती होईल. भागीदारीच्या व्यवसायात अनुकूलता वाढेल. नवे विचार मार्गी लावता येतील. भाग्योदयासाठी अधिक प्रयत्न लागतील. कलेचा गौरव होईल. अडचणीतून मार्ग निघत जाईल. महिलांना गृहसौख्य लाभेल. प्रगतीच्या घटना घडतील, विद्यार्थ्यांना सुसंधी.
 
तुळ : स्पर्धांमध्ये यश
 
 
चौथा शनि, आठवे मंगळ, राहू प्रतिकूल आहेत. निर्धाराने वाटचाल करावी. कौटुंबिक जीवनात सामंजस्याने राहावे. स्पर्धांमध्ये यश मिळेल. शारीरिक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. अनावश्यक खर्च टाळावेत. सरकारी कामे करून घ्यावीत. दगदग टाळावी. अपेक्षित कामे होतील. महिलांना अस्वास्थ्य राहील. विद्यार्थ्यांना अनुकूलता.
 

वृश्चिक : मतभेद टाळावे
 
 
सप्तमातील मंगळ, राहू प्रतिकूल आहेत. कौटुंबिक जीवनात मतभेदाचे प्रसंग टाळावेत. आर्थिक बाबतीत समाधानकारक घटना घडतील. होळी पौर्णिमेस कुलधर्म करावा. अडचणीतून मार्ग निघत जाईल. उष्णतेपासून त्रास संभवतो. सात्त्विक आचरण ठेवावे. महिलांना अस्वास्थ्य राहील. जपून असावे. विद्यार्थ्यांना अनुकूलता वाढेल.
 
धनु : नव्या संधी लाभतील
 
 
शारीरिक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक कामे मार्गी लागतील. कार्यसिद्धीसाठी अधिक प्रयत्नांची गरज भासेल. कलागुणांचा विकास होईल. नव्या संधी लाभतील. यांत्रिक क्षेत्रात प्रगती होत जाईल. आर्थिक कामे या सप्ताहात करून घ्यावीत. विचाराने राहावे. महिलांनी दगदग टाळावी. विद्यार्थ्यांना नव्या संधी लाभतील.
 
मकर : चिकाटीने राहावे
 
 
पंचमातील मंगळ-राहूमुळे आर्थिक बाबतीत समस्या राहतील. संततीच्या हितसंबंधांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. चिकाटीने राहावे. कार्यसिद्धी होत जाईल. नवे विचार मार्गी लावता येतील. सरकारी कामे मनासारखी होतील.अडचणीतून मार्ग निघत जाईल. प्रगतीचा सप्ताह आहे. महिलांना अस्वास्थ्य राहील. दगदग टाळावी, विद्यार्थ्यांना अडचणी राहतील.
 
कुंभ : अस्वास्थ्य राहील
 
 
धन व व्यवस्थानी शुभाशुभ ग्रह आहेत. आर्थिक बाबतीत अनुकूलता तसेच प्रतिकूलताही राहील. सुखस्थानी मंगळ, राहू असल्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अस्वास्थ्य राहील. स्थावर प्रश्न संभवतात. विचाराने राहावे. सरकारी कामे मनासारखी होतील. अपेक्षित कामे होतील. महिलांना अस्वास्थ्य राहील. दगदग टाळावी. विद्यार्थ्यांना प्रगतीचा काळ.
 
मीन : नव्या संधीचे स्वागत करावे
 
 
राशीतील रवि-बुधामुळे आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील, यांत्रिक, आर्थिक स्थितीत समाधानकारक सुधारणा होईल, अंगीकृत कार्यात यश मिळेल. नव्या संधीचे स्वागत करावे. अडचणीतून मार्ग निघत जाईल. नव्या योजना मार्गी लागतील. फारशी चिंता करू नका. ठामपणे राहावे. महिलांना सुखस्वास्थ्य राहील. विद्यार्थ्यांना सुसंधी.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.