बॉलीवूडच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ला कोरोनाची लागण; घेतली होती ठाकरेंची भेट

24 Mar 2021 14:51:10
amir khan and uddha thack



मुख्यमंत्र्यांना काही दिवसांपूर्वीच भेटला होता हा अभिनेता



मुंबई:
बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या आमिर घरीच विलगीकरणात आहे आणि कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत आहे. आमिर खानच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा देत हीन सर्व माहिती माध्यमांना दिली.
आमीर खान यांची तब्येत सुधारत आहे. परंतु नुकताच त्याने काही सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती आणि अनेक कलाकार, नेते यांच्या संपर्कात देखिल आला होता. आणि यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे अशा सगळ्या व्यक्तींनी खबरदारी म्हणून आपापली चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. शिवाय चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी आमिरला शुभेच्छा दिल्याबद्दल त्याने सर्वांचे आभार देखील मानले.


amir khan tasted positive


अलीकडेच रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, कार्टिन आर्यन, संजय लीला भन्साळी, वरुण धवन, नीतू सिंग यांसारख्या बॉलिवूड कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली होती.
Powered By Sangraha 9.0