मुंबई पोलीस दलात एकाच दिवशी तब्बल ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या ?

24 Mar 2021 13:35:36

transfer in mumbai poilce


बदली करण्यात आलेले सर्वाधिक अधिकारी क्राईम ब्रँचचे


मुंबई:
सचिन वाझेला झालेली अटक झाल्यांनतर त्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तांची झालेली उचलबांगडी, त्यानंतरचा लेटरबॉम्ब या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस दलात एकाच दिवशी तब्बल ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आणि विशेष बाब म्हणजे, त्यात ६५ अधिकारी हे क्राईम ब्रँचचे आहेत.

मुंबई पोलीस दलात एकूण ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात तब्बल ६५ बदल्या या क्राइम ब्रँचमधील अधिकाऱ्यांच्या आहेत. यामध्ये पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. मुंबई पोलीस खात्याचे पोलीस सहआयुक्त प्रशासन राजकुमार व्हटकर यांनी या बदल्या केल्या आहेत. मुंबईतील वेगवेगळी पोलीस ठाणे, सशस्त्र पोलीस दल, विशेष शाखा, वाहतूक, संरक्षण व सुरक्षा यांसारख्या विभागात सदर बदल्या झाल्या आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून रियाज उद्दिन काजी या सहाय्यक पोलिस निरीक्षकांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांची बदली गुन्हे शाखेतून सशस्त्र पोलीस दलात करण्यात आली आहे. त्याबरोबरच गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी सुनिल बळवंत माने यांचीदेखील एटीएस कडून चौकशी झाली असून त्यांना गुन्हे शाखेतून मुलुंड पोलीस ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0