वाझेच्या २०० पानी डायरीत नेमके काय ?

23 Mar 2021 17:23:19

vaze_1  H x W:



मुंबई :
अँटिलिया स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करणार्‍या राष्ट्रीय अन्वेषण पथकाला (एनआयए) सचिन वाझेची एक गुप्त डायरी हाती लागली आहे. ही डायरी त्याने करा,क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या कार्यालयात लपवून ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तंत्रज्ञानामध्ये तज्ज्ञ असूनही वाझेने कोणतेही गुप्त ऑनलाइन रेकॉर्ड ठेवले नाही, तर सर्व व्यवहार डायरीत नोंदविले आहे. ही डायरी ऑफिसमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या डायरीतून पैशांच्या व्यवहाराचे पुरावेही सापडले आहेत. यातील बहुतांश रोख रक्कम हस्तांतरणाची आहेत. एल आणि के या सांकेतिक शब्दाचा वापर करण्यात आल्याचेही या डायरीत आढळून आले आहे.


धमकीचे पत्र मुद्रित करणारे प्रिंटर जप्त केले


याच प्रकरणात मोठी कारवाई करत एनआयएने कळवामध्ये अटक केलेले कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांच्या फ्लॅटमधून एक प्रिंटर ताब्यात घेतला आहे. याच प्रिंटरच्या साहाय्याने धमकीचे पत्र छापल्याचा एनआयएला संशय आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0