गब्बरची 'दहाड', राहुल - कृणालची स्फोटक फलंदाजी

23 Mar 2021 18:43:39

Shikhar Dhavan_1 &nb
 
 
 
पुणे : भारत इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यातील पहिला सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट ओसोशिएशनच्या मैदानावरती खेळवला जात आहे. नेहमीप्रमाणे पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रीत केल. भारतीय संघाकडून सलामीसाठी अनुभवी फलंदाज रोहीत आणि शिखर धवनने दमदार सुरूवात केली. रोहीत शर्माच्या कोपराला चेंडू लागला त्यामुळे त्याला उपचार घ्यावा लागला. तरीही, त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
 
 
 
 
 
१६व्या षटकात भारताला पहिला झटका बसला. त्यानंतर विराट कोहली आणि धवनने ही जोडी बराच काळ मैदानात टिकून होती. त्यावेळी शिखर धवनने कमबॅक करत तडाखेबाज फलंदाजी केली. शिखर धवनला आदिल रशिदच्या गोलंदाजीवर झेलबाद स्वरूपात जीवदान मिळाले होते. मात्र, या जिवदानाचा फायदा घेत धवने ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०६ चेंडूत ९८ धावा करता आल्या. धवन आणि विराटनेही या मालिकेतील पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी केली. शिखर धवनचे एकदिवशीस सामन्यातील हे ३१वे अर्धशतक होते, तर विराट कोहलीही एकदिवसीय सामन्यातील ६१ अर्धशतक झळकावले. क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्य सचिन तेंडूलकरनंतर घरच्या मैदानावरती १०,००० धावा करणार विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
 
 
 
 
 
 
कोहली बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याही झटपट १ धाव करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या आणि पदार्पण करणाऱ्या कृणाल पांड्याने दमदार फलंदाजी करत २८ चेंडूंमध्ये अर्धशतक केले. त्याच्यासोबत के. एल. राहुलनेदेखील ४ चौकार आणि ४ षटकारांसह ४३ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी केली. कृणालने पदार्पणातच आपली खेळी दाखवत ७ चौकार आणि २ षटकारांसह ३१ चेंडूत ५८ धावांची नाबाद खेळी केली. यावेळी तो चांगलाच भावूक झाला. ५० षटकांमध्ये भारतीय संघाने ५ विकेट्सच्या बदल्यात ३१७ धावा केल्या.
 
 
Powered By Sangraha 9.0