डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित ‘शॉर्ट फिल्म स्पर्धा’

23 Mar 2021 13:05:02

DR. a. p j. abdul kalam_1





नाशिक:
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या खर्‍या विचारांना जीवंत ठेवण्यासाठी व त्यांचा जीवनपट इतरांना मार्गदर्शक होण्याच्या उद्देशाने ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन’ने युवा पिढीसाठी ‘आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म स्पर्धा’ आयोजित केलेली आहे.



‘पद्मभूषण’ ए. आर. रहमान यांनी आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर इंटरनॅशनल शॉर्टफिल्मचे पोस्टर लॉन्च केले. डॉ. कलाम यांचे शब्द आजही लोकांच्या कानावर पडतात तेव्हा त्यांच्या कार्याचा आदर केला जातो. डॉ. कलाम यांच्या जीवनातील विविध पैलूंचे उत्कृष्ट वर्णन नवीन पिढीसमोर आणण्यासाठी व नवोदित कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेसाठी पाच वेगवेगळ्या थीम उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


या लघुपटनिर्मितीसाठी खालील पाच ‘थीम’वर आधारित फिल्म अपेक्षित आहे. १) डॉ. कलाम एक उत्कृष्ट शिक्षक, २) डॉ. कलाम मिसाईल मॅन ऑफ इंडिया, ३) डॉ. कलाम एक शास्त्रज्ञ, ४) डॉ. कलाम इंडिया व्हिजन २०२०, ५) डॉ. कलाम पीपल्स प्रेसिडेंट ऑफ इंडिया याप्रमाणे तरुण कलाकार चांगल्या कल्पनेसह त्यांच्या अभिनव कल्पना सादर करू शकतात. साधारणपणे ३ ते २० मिनिटांच्या कालावधीचा भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर लघुपट बनवायचा आहे.



या स्पर्धेमध्ये वय १८ वर्षांवरील सर्व मुलांसाठी खुले आहे. प्राप्त झालेल्या लघुपटातून योग्य लघुपट प्रख्यात निर्णायक मंडळाद्वारे निवडला जाईल. आणि जे सर्वोत्कृष्ट तीन चित्रपट विजयी चित्रपट म्हणून निवडले जातील, त्यास रोख किमतीने पुरस्कार दिले जातील, अपेक्षा करतो. अधिक माहितीसाठी हाऊस ऑफ कलाम, रामेश्वरम, तामिळनाडू येथे कॉल करावा ९४८६६६१९३१; ०४५७३२२१९३१ असे महाराष्ट्राच्या कोअर कमिटीतर्फे कळविण्यात येत आहे.




Powered By Sangraha 9.0