सुशांतचा छिछोरे ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट तर कंगना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

22 Mar 2021 19:23:23

National Film_1 &nbs
 
 
नवी दिल्ली : सोमवारी २२ मार्चला २०१९च्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या 'छिछोरे' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देऊन सन्मानित करणायत आले. तसेच, अभिनेत्री कंगना रानौतला 'मानिकार्निका' आणि 'पंगा' या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार देण्यात आला. 'भोसले' या चित्रपटासाठी मनोज वाजपेयीला तर 'असुरन' या चित्रपटासाठी धनुशला सामायिकरित्या सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे.
 
 
 
कंगनाला चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी तिला फॅशन, क्वीन, तनु वेड्स मनु रिटर्न्स या सिनेमांसाठी पुरस्कार मिळाला आहे. शबाना आझमींनंतर कंगनाने सर्वाधिक ४ वेळा या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट पुरुष गायकसाठी बी प्राकला 'केसरी' चित्रपटातील तेरी मिट्टी या गाण्यासाठी पुरस्कार देण्यात आला.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0