तिन्ही रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक

20 Mar 2021 19:55:58
 
 
 
 
mumbai megablock_1 &
 
मुंबई, दि. 20 (प्रतिनिधी) : दुरुस्ती आणि डागडुजीच्या विविध कामांसाठी उद्या (21 मार्च) मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी - विद्याविहार स्थानकांदरम्यान अप व डाउन धीम्या मार्गांवर सकाळी 10.55 ते सायंकाळी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या काळात सीएसएमटी स्थानकातून सुटणार्‍या डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार स्थानकापर्यंत डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. पुढे त्या डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर स्थानकापासून पुढे अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या कालावधीत मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान लोकल थांबणार नाहीत.

हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी 11.40 ते संध्याकाळी 4.40 पर्यंत, तर चुनाभट्टी-वांद्रे सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरु राहणार आहे. या कालावधीत वडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते सायंकाळी 4.47 या वेळेत डाऊन मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वांद्रे - गोरेगाव करीता सकाळी 9.02 ते सायंकाळी 4.43 पर्यंत सुटणार्‍या लोकलसेवा बंद राहणार आहेत. अप हार्बर मार्गावर पनवेल-बेलापूर-वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणार्‍या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीकडे जाणार्‍या लोकलसेवा बंद आहेत. या कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येत आहेत. दुरुस्तीच्या कालावधीत हार्बरमार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावरील माहीम - वांद्रे व वांद्रे - अंधेरी स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरु राहणार आहे. या कालावधीत हार्बर मार्गावरील व गोरेगाव - चर्चगेट स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे.
Powered By Sangraha 9.0