स्तुत्य उपक्रम! 'ही' कंपनी देणार कर्मचाऱ्यांना मोफत लस

    दिनांक  18-Mar-2021 17:50:08
|

Lodha _1  H x W
 


मुंबई : 'लोढा समुह' या भारतातील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट विकसक कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांच्या कोरोना लसीकरणाचा खर्च उचलणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच कर्मचाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या कुटूंबातील सर्व सदस्यांनाही मोफत लस देणार असल्याचे म्हटले आहे.
 
 
कोरोना महामारी काळात कंत्राटी पद्धतीने समुहाशी जोडल्या गेलेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. भविष्यात टप्प्याटप्प्याने याचा लाभ कर्मचाऱ्यांना घेता येईल, असे म्हटले आहे. कंपनीतर्फे नियोजित रुग्णालयांमध्ये याची व्यवस्था केली जाईल. रुग्णालयात लस उपलब्ध होणे सुलभ होईल आणि प्रतिक्षा कालावधी किमान राहील.
 
 
सरकारच्या धोरणानुसार, सध्या ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या सर्वांना आणि ४५ वर्षांहून अधिक वय व काही आजार असलेल्यांना लसीकरण उपलब्ध आहे. सरकार पुढील घोषणा करेल तसेच नवीन टप्प्यांना सुरुवात होईल, त्याप्रमाणे लोढा समुह १५,००० हून अधिक लोकांच्या मोफत लसीकरणासाठी आवश्यक त्या बाबी उपलब्ध करून देईल तसेच पर्याय देईल.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.