नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू बबिता फोगटच्या घरावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. बबिताची मामेबहीण रितिकाने महाबीर फोगट यांच्या गावातील घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भरतपुरमध्ये आयोजित कुस्ती स्पर्धेत पराभव झाल्याने आत्महत्या केल्याची माहिती देण्यात येत आहे.
रितिका कुस्तीपटू महाबीर फोगट यांच्या अकादमीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून प्रशिक्षण घेत होती. रितिकाने १२ ते १४ मार्च दरम्यान भरतपूर येथील राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला व पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. या दरम्यान १४ मार्चला झालेल्या अंतिम सामन्यात रितिकाला एका गुणाने पराभव पत्करावा लागला. या सामन्यावेळी तेथे महाबीर फोगटही उपस्थित होते.
सामन्यात झालेल्या पराभवानंतर रितिकाला मोठा धक्का बसली असल्याचे सांगण्यात येत आहे. १५ मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास महाबीर फोगाट येथील बलाली गावातील घराच्या खोलीत पंख्याला गळफास घेत तीने आत्महत्या केली. त्यानंतर मंगळवारी राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील जैतपूर या गावी तीच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.