भारतीय हवाई दलाचे मिग- २१ लढाऊ विमानाला अपघात

17 Mar 2021 15:48:01

mig-21_1  H x W


ग्रुप कॅप्टन ए गुप्ता अपघातात शहीद

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचे मिग -२१ बायसन विमान कोसळले आहे. प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी मध्य भारतातील एअरबेसवर लढाऊ प्रशिक्षण मोहिमेसाठी जात असताना, हा विमान अपघात घडला. या अपघातात 'आयएएफ'चे ग्रुप कॅप्टन ए. गुप्ता शहीद झाले. भारतीय वायुसेनेने या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.





यापूर्वीही राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील सूरतगढमध्ये हवाई दलाचे मिग- २१ बायसन लढाऊ विमान कोसळले होते. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे समजाच पायलट विमानातून सुखरूप बाहेर येण्यास यशस्वी ठरले होते. हवाई दलाच्या या लढाऊ विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण केले होते.




Powered By Sangraha 9.0