वाझेंच्या ‘स्थानिक’ प्रकरणावर शरद पवार दिल्लीत बोलले...

16 Mar 2021 19:58:54

sp_1  H x W: 0


‘एनआयए’
ला सहकार्य करणे हे महाविकास आघाडीचे कर्तव्य - पवार


एका पोलिस निरिक्षकाचा परिणाम राज्य सरकारवर होणार नाही. सचिन वाझे प्रकरणात केंद्रीय यंत्रणा तपास करीत आहेत आणि त्यांना सहकार्य करणे हे महाविकास आघाडीचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत केले.नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी :


“सचिन वाझे प्रकरण हे स्थानिक आहे, आपण त्यावर बोलणार नाही” अशी भूमिका शरद पवार यांनी नुकतीच घेतली होती. मात्र, काँग्रेसचे माजी नेते पी. सी. चाको यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाविषयी दिल्ली येथे आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकारपरिषदेत अखेर ‘स्थानिक’ प्रश्नाचे उत्तर पवारांनी दिले.
 
 
पवार म्हणाले, एखाद्या पोलिस निरिक्षकाचा परिणाम सरकारवर आणि राज्यावर होईल, असे मला वाटत नाही. सचिन वाझे प्रकरणी एनआयए ही केंद्रीय तपास यंत्रणा चौकशी करीत आहे, त्यामुळे त्याविषयी मी बोलणार नाही. मात्र, केंद्रीय यंत्रणांना सहकार्य करणे हे महाविकास आघाडीचे कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे त्यांना तपासात कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत, याकडेही लक्ष देणे राज्य सरकारचे काम आहे.



मात्र, ज्यांनी आपल्या अधिकारांचै गैरवापर केला अथवा चुकीचे काम केले त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम एनआयए करीत असेल तर महाविकास आघाडी पूर्ण सहकार्य करेन. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही कुरबुरी नाहीत काही समस्या असल्या तरीही त्या चर्चेतून सोडविल्या जातात, असेही पवार यावेळी म्हणाले.



Powered By Sangraha 9.0