मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर

16 Mar 2021 20:27:09

bharat bhalke.jpg 1_1&nbs 
 
 

 १७ एप्रिलला मतदान तर २ मे रोजी निकाल

पंढरपूर : राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी दिनांक १७ एप्रिलला मतदान होईल तर मतमोजणी दिनांक २ मे रोजी होऊन निकाल जाहीर केला जाईल.
 
आज निवडणुक आयोगाने देशातील २ लोकसभा तर १४ विधानसभेच्या जागांसाठी निवडणुकांसाठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मंगळवेढा मतदारसंघासाठी दि.२३ मार्च ते ३० मार्च पर्यंत अर्ज दाखल करावा लागणार असून ३१ मार्चला अर्जांची छानणी होईल. तर ३ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे आहे

१५ मार्चपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येईल. भारत भालकेंच्या आकस्मिक निधनामुळे ही जागा रिकामी झाली आहे. निवडणुकीच्या संदर्भातील आवश्यक ती माहिती निवडणूक आयोग दोन दिवसात जाहिर करणार असल्याची माहिती निवडणुक आयोगाच्या सुत्रांनी दिली आहे.





Powered By Sangraha 9.0