महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला ; दोन्ही राज्यांकडून एसटी वाहतूक बंद

13 Mar 2021 15:55:49

mh karntk_1  H



सांगली :
महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा चिघळला असून दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दोन अज्ञात व्यक्तीकडून महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील घडली. दरम्यान, खबरदारी म्हणून दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. शुक्रवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात शिवसेनेच्या वाहनांवर केला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापुरात शिवसेनेने कर्नाटक बस रोखली होती.

कन्नड रक्षिक वेदिक संघटनेकडून  काल दुपारी बेळगावमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर हल्ला केला आणि गाडीवरील झेंडा काढून कारची तोडफोड केली. हा हल्ला कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. काही कार्यकर्ते शिवसेनेच्या शाखेकडे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी एकट्या शिवसैनिकाने कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांना विरोध केला. यानंतर मराठी भाषिकांनी त्याठिकाणी निदर्शनं करून कर्नाटक प्रशासन आणि कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांविरोधात घोषणाबाजी केली.या घटनेनंतर कोल्हापूर बस स्थानकावरील महाराष्ट्राच्या बसवर आज पहाटे कर्नाटकमधील एका नागरिकाने दगडफेक केली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले असून दगडफेक करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे. आज पुन्हा असा प्रकार घडू नये याच्यासाठी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये एकही बस सोडली जाणार नाही. तर कर्नाटकमधून एक दिवस महाराष्ट्रात येणार नाही.



रोज महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटीच्या २५ फेऱ्या कर्नाटक राज्यात मध्ये होत होत्या. त्या सर्व बंद करण्यात आल्या आहेत. कर्नाटक राज्यातून ही तितक्याच फेऱ्या महाराष्ट्रात होत होत्या त्यासर्व फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून नाईलाजाने त्यांना वडाप वाहतुकीने प्रवास करण्याची वेळ आली आहे.
Powered By Sangraha 9.0