चंद्रपूरचे माजी आमदार एकनाथ साळवे यांचे वृद्धापकाळाने निधन

13 Mar 2021 18:14:05

eknath salave_1 &nbs



'ध्येयवादी समाजसेवक हरपला"- सुधीर मुनगंटीवार.




चंद्रपूर:
चंद्रपूरचे माजी आमदार एकनाथ साळवे यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील बामणी या मुळ गावी उद्या त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.
 
 
अनेक नक्षल संदर्भातील खटल्यात नक्षल्यांचे आणि आदिवासींचे वकील म्हणूनही त्यांनी काम केले आहे. एकनाथ साळवे यांनी लिहिलेली 'एन्काऊंटर' ही नक्षलवादावरची कादंबरी विशेष गाजली होती. या कादंबरीमुळे त्यांना साहित्यविश्वात लेखक म्हणून ओळख मिळवून दिली. माजी आ. साळवे यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0