‘डिजिटल’ भविष्यवेत्ता

11 Mar 2021 17:57:04
jitin masand_1  
‘ओकी (जघखए) वेंचर्स प्रा.लि.’ ही जगभरातील इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत आपली पाळेमुळे घट्ट रोवू पाहणारी एक कंपनी. जितिन मसंद या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी). ‘लॉकडाऊन’मध्ये हातावर हात ठेवून बसणे, काय होत आहे, हे पाहणे जितिन यांच्या पचनी पडणारे नव्हते. अवघ्या काही महिन्यांत झपाटून केलेल्या कामामुळे वेगाने यशाचा चढता आलेख त्यांच्या कंपनीने पाहिला आहे. त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणजे अभिनेत्री काजल अग्रवाल यांनी त्यांच्या ब्रॅण्डवर आणि कंपनीवर दाखवलेला विश्वास...
 
आता कोरोनाची परिस्थिती म्हटली की, ‘लॉकडाऊन’ कुणालाच सुटलेला नाही. देशात अचानक सर्वकाही ठप्प झाले. हळूहळू आकार घेत असलेल्या जितिन यांच्या व्यवसायाला अचानक खीळ बसणार होती. इतके दिवस केवळ घरात बसायचे ही कल्पनाच त्यांना जमेनाशी होती. आधीच उद्योगाचा एवढा पसारा, त्यात नव्याने बर्‍याच गोष्टींची सांगड घालण्याचा त्यांचा प्रयत्नही होताच. त्यात थांबलेले जग आणि व्यवहार यातून मार्ग कसा काढायचा, हा प्रश्न कंपनीपुढे होता. यातील सर्वात मोठी अडचण ठरली ती म्हणजे दैनंदिन खर्चासाठी लागणारा निधी, वाहतूक व्यवस्था, मेहनतीने तयार केलेली वितरण व्यवस्था आणि मनुष्यबळाची टंचाई. इतके सर्व प्रश्न समोर असतानाही, कंपनीने आखलेले नियोजित कार्यक्रमही पुढे न्यायचे होते. निधीची अडचण सोडवण्यासाठी जितिन यांनी आपली स्वकमाई पुन्हा एकदा पणाला लावली होती.
 
‘लॉकडाऊन’मध्ये एका उद्योजकासाठी ती एक सर्वात मोठी जोखीम होती. अर्थात, यातून कंपनीच्या आवश्यकता भागवण्याची गरज होती. कर्मचारी हे धन आहे, असे मानणार्‍या जितिन यांनी या काळात सर्वांना आपले कुटुंब मानले. एकाही कर्मचार्‍याचा पगार थकवला नाही. ज्यांना शक्य होते, त्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सवलत दिली. तसेच मोजक्या कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत मुंबईसह अन्य ठिकाणचीही कार्यालये सुरू ठेवली. या सर्वांना वेळच्या वेळी त्यांच्या कामाचा मोबदला दिला. ज्या कर्मचार्‍यांना कार्यालयात उपस्थित राहणे गरजेचे होते, त्या सर्वांसाठी वाहतुकीची सोय उपलब्ध करून दिली. कार्यालयाच्या ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले. तसेच प्रत्येक कर्मचार्‍याचा वैद्यकीय अहवाल पाहूनच त्यांना कार्यालयात बोलवण्यात आले. ‘सोशल डिस्टन्सिंग’ आणि अन्य मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्यात आला. नव्यानेच स्थापन झालेल्या मुंबईतील कार्यालयात नव्याने १०० ते १५० जणांना नव्याने रुजू करून घेण्यात आले. ‘लॉकडाऊन’मध्ये अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.
 
‘लॉकडाऊन’ सुरू झाला, तरीही कारभार थांबला नव्हता. ‘ओकी’ (जघखए) टीव्हीची बाजारात मागणी वाढत चालली होती. अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त असलेल्या या ‘टेलिव्हिजन’ संचांना भारतीय बाजारपेठेत मागणी वाढत आहे. 4G डिसप्ले, सराऊंड साऊंड बार, एचडी १९२० द १०८०, ‘एचटीएमएल’ आणि ‘अ‍ॅण्ड्रोईड’ प्रणाली हे या टीव्हीचे वैशिष्ट्य. ऑनलाईन गेमिंग, ‘ई-लर्निंग’ यांसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज अशा या उत्पादनाने भारतीय बाजारपेठेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळातही तब्बल कोट्यवधींची उलाढाल या कंपनीने केली. तसेच कंपनीने याच दरम्यान सरकारचा करभरणाही वेळच्या वेळी केला आहे.
 
jitin masand_1  
 
 
कोरोनाच्या कठीण काळात सामाजिक जबाबदारी म्हणूनही कंपनीने विविध उपक्रम राबविले. विशेष म्हणजे, ‘ओकी’च्या सर्व कर्मचार्‍यांची जबाबदारी जितिन यांनी स्वतः स्वीकारली. त्यातही नवे-जुने असा कुठलाही भेदाभेद न करता, कर्मचार्‍यांना लागेल ती मदत त्यांनी या काळात पोहोचविली. कामगारांवर दाखवलेला हाच विश्वास त्यांना कामी आला. ‘कोविड’काळात आरोग्य सांभाळत काम करण्याचे आव्हान होतेच. तेव्हा कर्मचार्‍यांनी आपली संपूर्ण जबाबदारी चोखपणे बजावली. त्याचा फायदा असा झाला की, कंपनीने ‘लॉकडाऊन’च्या काळातही झपाट्याने विस्तार करण्याच्या मोहिमा सुरू केल्या. परिणामी, विक्रीचा आलेखही उंचावत चालला आहे.
 
जितिन मसंद यांनी ‘लॉकडाऊन’च्या काळातही व्यवसायानिमित्त भारतभर दौरे केले. कामाचा पसाराच इतका मोठा असल्याने त्यांना सर्व नियमावलींचे पालन करून त्यांनी विविध राज्यांमध्ये असलेल्या आपल्या कार्यालयांतही उपस्थिती लावली. दिल्ली-कोलकाता आदी शहरांमध्ये वारंवार यानिमित्त प्रवासही होत होता. ‘अनलॉक’च्या प्रक्रियेतही असा प्रवास करण्याची जोखीम त्यांनी कंपनीसाठी पत्करली. या सगळ्या काळात घरच्यांनीही चांगला पाठिंबा दिला. त्या सर्वांना विश्वासात घेऊनच त्यांनी या परिस्थितीवर मात केली. आई, पत्नी व मुलांनीही जितिन यांना सहकार्य केले. याच काळात एक विश्वासू सहकारी म्हणून कंपनीचे सीईओ निमिश ताल्सानिया यांचा मोलाचा हातभार लागला.
 
एका निश्चित ‘व्हिजन’ आणि ‘मिशन’ने कार्यरत असणार्‍या या कंपनीने ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेत सहभागी होत, भारतभर विस्तार करण्याचे स्वप्न पाहिले आहे. नवनिर्मितीचा ध्यास असणार्‍या ‘ओकी’ कंपनीचे ‘मोबाईल फोन्स’, ‘स्मार्ट वॉचेस’, ‘फिचर फोन्स’, ‘सीसीटीव्ही कॅमेरा’, ‘म्युझिक सिस्टीम्स’, ‘वॉशिंग मशिन्स’ आणि ‘एसी’ आदी उत्पादनांवर भर देण्याचा मानस आहे. एकूण देशभरातील २४ ठिकाणी, ३०० ‘डिस्ट्रिब्युटर्स’चे नेटवर्क आणि तब्बल ७,५०० ‘रिटेलर्स’ आदी कोट्यवधी ग्राहकवर्ग असणार्‍या या कंपनीचे वितरण व्यवस्थापन तब्बल १००हून अधिक जणांची ‘सेल्स टीम’ही कार्यरत आहे.
 
कोरोना काळात या सर्वांना एकसंध ठेवून काम करण्याचे आव्हान संपूर्ण टीमने चोख केले. कंपनीतर्फे आता भविष्यात ‘ऑनलाईन गेमिंग’ विश्वात आणखी विस्तार सुरू करण्याचा विचार केला आहे. भारतीय परंपरा जपणारे ‘दहीहंडी’, ‘वल्लम कली’ अशा ‘ऑनलाईन गेम’चा समावेश करून ‘गेमिंग’ क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारत’ बनवण्याचे स्वप्न टीमने पाहिले आहे. नव्या वाटा निवडून आपले विश्व उभे करणार्‍या या ‘कोविड योद्ध्या’ला सलाम!
 
 
"कोरोना काळात काम करण्याची प्रेरणा आम्हाला कर्मचार्‍यांतर्फेच मिळत गेली. अनेकांनी महामारीच्या काळात असूनही आपली कंपनी वृद्धीकडे जाईल याची काळजी घेतली. या सर्वांच्या समर्पणाच्या भावनेमुळेच मीही स्वतःला झोकून दिले होते."
 
 
Powered By Sangraha 9.0