सचिन वाझेंची बदली ; गृहमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती

10 Mar 2021 12:32:41


sachin waze_1  


सचिन वाझेंना क्राईम इंटेलिजन्स युनिटमधून काढून दुसऱ्या विभागात बदली करणार ; गृहमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा

मुंबई : 
अंबानी स्फोटक प्रकरणातील गाडी मालक मनसुख हिरेन याची संशयास्पद मृत्यू झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी केली होती. पोलीस अधिकारी सचिन वाझेंना तात्काळ अटक करावी ही मागणी केली होती. मात्र सचिन वाझेंना क्राईम इंटेलिजन्स युनिटमधून काढून दुसऱ्या विभागात बदली करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत दिली आहे.


मनसुख हिरेन यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सचिन वाझे हे व्यवसायाच्या निमित्ताने ओळखीचे असल्याचे सांगितले. माझ्या पतीचा खून झाला असावा आणि तो सचिन वझे यांनी केला असावा असा मला संशय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक केली जावी अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. आज देखील भाजप ने विधान भवनाच्या पायर्‍यांवर याविरोधात निदर्शने केली यानंतर आखेत आज त्यांची बदली करण्याचा निर्णय ग्रहमंत्री यांनी केला आहे.


Powered By Sangraha 9.0