'आपला आदर वाटतो'; रोहित पवारांच्या अमृता फडणवीसांना शुभेच्छा

10 Mar 2021 16:30:58

rohit pawar_1  


मुंबई :
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अमृता फडणवीस यांचे महिला दिनी प्रदर्शित झालेल्या गाण्याचे ट्विट करुन कौतुक केले आहे. याला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनीही रोहित पवार यांचे आभार मानले आहे.




महिला दिनाच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया देत असताना म्हणाले की, काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही. पण ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!, असे ट्विट रोहित पवार यांनी केले होते. याच ट्विटला उत्तर देताना विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही रोहित पवार यांचे आभार मानले.


गेल्या अनेक दिवसांपासून नेटकऱ्यांमध्ये चर्चा असलेले अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे सोमवारी प्रदर्शित झाले. महिलादिनी प्रदर्शित झालेल्या या गाण्यातून आपली आवड जोपासण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका यशस्वी तरुणीची कथा सांगण्यात आली आहे. या गाण्याला प्रेक्षकांनीही पसंती दर्शविली आहे.

Powered By Sangraha 9.0