मूळ मुद्दा जाणून घेतल्याशिवाय देशांतर्गत गोष्टींवर चर्चा करू नका !
नवी दिल्ली : देशात गेल्या ७० दिवसांपापसून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी आवाज उठवला आहे. नॉर्वेची १८ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पॉप सिंगर रिहाना, हॉलीवूड कलाकार अमांडा, वकील आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस यांची पुतणी मीना हॅरीस, मिया खलीफासह अन्य विदेशी कलाकारांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले आहे. या सर्वांनी शेतकरी आंदोलनावर तीव्र प्रतिक्रीया दिल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय समर्थनानंतर भारतीय परराष्ट्र सचिव अनुराग श्रीवास्तव यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, "आपला अजेंडा ठरवण्यासाठी अनेक आंदोलनकर्ते या गोष्टींचा आधार घेत आहे. कुणीही यावर भाष्य करण्यापूर्वी परिस्थिती समजून घ्यावी, या घटनेमागील तथ्य समजून घ्यावे. संसदेत चर्चा केल्यानंतरच हे कायदे पारित केले आहे. सोशल मीडियावर या कायद्यांविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे."
ग्रेटा, रिहाना शेतकऱ्यांसोबत
पर्यावरण बदलाविषयक कार्यकर्ती असलेल्या ग्रेटा थनबर्ग हिने समर्थन दिले आहे. यावर कंगना रणौत हिनेही प्रतिक्रीया दिली आहे. कंगना म्हणते, "हे शेतकरी नव्हे तर दहशतवादी आहेत. कॅनडा पंतप्रधान जस्टीन टूडो यांनीही शेतकऱ्यांना समर्थन दिले आहे. हॉलीवुड अभिनेत्री अमांडा कर्नी हिनेही सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले आहे. पोर्न स्टार असलेल्या मिया मिया खलीफाने ट्विटरवर फोटो शेअर केले आहेत. ती म्हणते, "पेड अॅक्टर्स, कास्टींग डिरेक्टरचे म्हणणे आहे, मला आशा आहे की पुरस्कार सोहळ्यात याकडे दुर्लक्ष केले जाऊ नाही. मी शेतकऱ्यांसोबत आहे."
आपण आंदोलनाबद्दल का बोलत नाही !
पॉप सिंगर रिहानाने मंगळवारी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात ट्विटरवर #FarmersProtest हा हॅशटॅग वापरून म्हणाली की, "आम्ही शेतकरी आंदोलनावर चर्चा का करत नाही. ३२ वर्षाची पॉप स्टार रिहाना मूळची वेस्ट इंडिजची बारबाडोसची राहणारी आहे. तिचे पूर्ण नाव रिहाना फेन्टी आहे. तिचे एकूण ९० टक्के अल्बम हीट आहेत. सध्या तिच्याकडे अमेरिकेची नागरिकता आहे.
कंगना भडकली
कंगनाने सोशल मीडियावर रिहानाला टॅग करून प्रश्न विचारला आहे. यावर कुणी बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत, ते दहशतवादी आहेत, ते भारताला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. विस्तारवादी चीनच्या मनसूब्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करून उपनिवेशक बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शांत बसा, तुमच्याप्रमाणे आम्हाला देश विकायचा नाही, असा टोला तिने लगावला आहे.