जय श्री राम! : रामभक्ताने दिलेल्या देणगीची रक्कम ठरली चर्चेचा विषय

    दिनांक  28-Feb-2021 21:42:07
|

ईोस _2  H x W:
 
 


नवी दिल्ली : देशभरात श्रीराम मंदिर निधी संकलनाला प्रचंड पाठींबा मिळत आहे. या राष्ट्रमंदिरात आपला खारीचा वाटा असावा, अशी प्रत्येक रामभक्ताची इच्छा आहे. त्यानुसार प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देणगी देत आहेत. देणगी गोळा करणाऱ्या स्वयंसेवकांना अनेक कडू-गोड अनुभव येत आहेत, अशाच एका देणगीदाराचा विषय चर्चेत आला आहे.
 
 
 
दोन लाख १४ हजार दोनशे १४, असे या देणगीच्या रक्कमेचे स्वरुप आहेत. अक्षरांत वाचून कदाचित हा अंक का निवडला, असावा किंवा हा धनादेश का चर्चेत आला असावा याचा अंदाज येणार नाही. मात्र, अंकामध्ये ही देणगीची रक्कम पाहिली जाते तेव्हा हा क्रमांक 214214 (रामराम) अशा स्वरुपात दिसून येतो. यामुळे हा धनादेश चर्चेत आला आहे.
 
 
 
 

ईोस _1  H x W:  
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.