१५ दिवसांत ३६ हजार रुग्णवाढ, मुख्यमंत्र्यांना कौतूक धारावी पॅटर्नचे

28 Feb 2021 19:52:02

cmo _1  H x W:
 
 


कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्र देशात अव्वल

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अद्यापही 'धारावी पॅटर्न'चे कौतूक करत असताना महाराष्ट्राने कोरोना आकडेवारीत पुन्हा आगेकूच 'करून दाखवली' आहे. महाराष्ट्रात एकूण ७२ हजार ५३० रुग्णांवर उपचार सुरू आहे. ही आकडेवारी काही दिवसांत लाखोंच्या घरात जाते की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये ३६ हजार रुग्णांची वाढ झाली आहे, सातत्याने कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीचा आलेख पाहता पुण्यातील रात्रीची संचारबंदी १४ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्रानंतर कोरोना आकडेवारीत दुसरा क्रमांक लागतो. या राज्यातही ५० हजार ५१० रुग्णांचा इलाज सुरू आहे.
 
 
अरुणाचल कोरोनामुक्त
 
 
कोरोनाच्या वाढत्या आलेखात आता अरुणाचल प्रदेश हे राज्य कोरोनामुक्त बनले आहे, आता ते देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य बनले आहे. गेल्या २४ तासांमध्ये एकही नवा कोरोना रुग्ण आढळलेला नाही. तिथे एकूण १६ हजार ८३६ लोक संक्रमित झाले होते. त्यापैकी १६ हजार ७८० कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
 
२३ राज्यांमध्ये वाढले कोरोना रुग्ण
 
 
गेल्या २४ तासांत ३६ पैकी २३ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. त्या राज्यांमध्ये मृत्यू झालेल्यापैकी बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी ८ हजार ६२३ नवे रुग्ण आढळले आहेत. ३ हजार ६४८ रुग्ण बरे होऊन घरे झाले आहेत. त्यापैकी ५१ रुग्णांचा २४ तासांत मृत्यू झाला आहे.
 
 
२४ तासांत १६ हजार रुग्णांची वृद्धी
 
 
शनिवारी देशात एकूण १६ हजार ८०३ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ११ हजार ७०७ जण बरे झाले आहेत. ११२ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत १.११ कोटी रुग्ण कोरोनाच्या विळख्यात आढळले आहेत. त्यापैकी १.०७ कोटी रुग्ण बरे झाले आहेत. १.५७ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरात एकूण १.६१ लाख जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
 
 
कोरोनाविषय अपडेट्स
 
पुणे शहरात लावण्यात आलेले निर्बंध १४ मार्चपर्यंत वाढवले आहेत. त्या दरम्यान एकूण शाळा, महाविद्यालये व खासगी कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत. रात्री ११ ते सकाळी सहा वाजतापर्यंत निर्बंध कायम राहणार आहेत. अत्यावश्यक सेवांना त्यातून मुभा असेल.
 
 
या राज्यांत प्रवेशासाठी कोरोना चाचणी आवश्यक
 
 
ओडिशा सरकारतर्फे महाराष्ट्र, छत्तीसगड, केरळ, मध्यप्रदेश आणि पंजाबहून आलेल्या प्रवेशांसाठी कोरोना टेस्ट आवश्यक करण्यात आली आहे. त्याअंतर्गत यानंतर आलेल्या प्रवाशांची स्क्रीनिंग चालू करण्यात आली आहे. संक्रमित आढळल्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.
 
 
देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा
 
 
देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा हा १ मार्चपासून सुरू होणार आहे. १० हजार सरकारी केंद्र व २० हजार खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाची लस दिली जाणार आहे. पूर्वीपासून व्याधी असणाऱ्या अशा ४५ वर्षावरील व्यक्तींना व ६० वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहिम सुरू होणार आहे. ज्यांना खासगी रुग्णालयांतून कोरोना लस घ्यायची आहे त्यांच्यासाठी अडीचशे रुपयांत ही लस दिली जाणार आहे.
 
 
को-विन अॅप अपडेट होणार असल्याने रविवारी लसीकरण नाही
 
देशभरात कोरोना लसीकरणाची सुरुवात रविवारपासून सुरू झाली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार को-विन अॅप अपडेट केले जात असल्याने २७ आणि २८ फेब्रुवारीला लसीकरण सुरू नव्हते. मोबाईल अॅपद्वारे सर्वसामान्य नागरिक लसीकरणासाठी नावनोंदणी करू शकतात.
 
 
 
 
महाराष्ट्रातील जनतेने गांभीर्याने घ्यायला हवे !
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लॉकडाऊनबद्दल माहिती दिली. नागरिकांनी कोरोनाला गांभीर्याने घेतले नाही तर आम्हाला नाईलाजाने निर्णय घ्यावा लागेल, असे सुतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहेत. राज्यात शनिवारी ८ हजार ६२३ रुग्णांची नोंद झाली. आता एकूण राज्यात ७२ हजार ५३० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१४ टक्के झाले आहे.






Powered By Sangraha 9.0