राठोड समर्थकांच्या सडक्या मेंदूतली आयडिया : चित्राताईंचा फोटो केला 'एडीट'

26 Feb 2021 18:02:22
bjp _1  H x W:



मुंबई : विरोधाला विरोध म्हणून कुठल्याही थराला राठोड समर्थक जाणार याचा थांगपत्ता लागेनासा झाला आहे. पूर्वी धमक्यांवरती मर्यादीत असणाऱ्या राठोड समर्थकांनी आता चित्रा वाघ यांचे फोटो मॉर्फ करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी भाजपतर्फे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
 
 
 
गुरुवारी चित्रा वाघ यांनी पूजाच्या मृत्यूस्थळाला भेट दिली. पूजाने ज्या इमारतीतून उडी घेतली तिथल्या ठिकाणचीही पाहणी केली. त्यानंतर चित्रा वाघ यांनी पोलीस अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. तपास यंत्रणांवरही आक्षेप घेतला. इतकेच नव्हे तर राठोड यांच्या राजीनाम्याचीही मागणी लावून धरली होती. त्यामुळे तीळपापड झालेल्या संजय राठोड आणि समर्थकांनी चित्रा वाघ यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. मात्र, धमक्यांना भीक घालत नाही, असे म्हणत वाघ यांनी पलटवार केला होता.
 
 
 
 
व्हायरल फोटो मागचे सत्य!
 
चित्रा ताई आणि संजय राठोड यांचा फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर पसरवला जात आहे. त्या फोटोची पुष्टी केली असताना हा फोटो त्यांच्या पतीचा असून त्याच्या जागी राठोड यांचा फोटो लावण्यात आला होता. या प्रकाराची गंभीर दखल गृहमंत्रालयाने घेण्याची मागणी आता भाजपने केली आहे. महाराष्ट्र भाजपचे सोशल मीडिया प्रमुख प्रवीण अलई यांनी या प्रकरणी ट्विट करत राठोड समर्थकांची पोलखोल केली आहे.



Powered By Sangraha 9.0