बालाकोट एअर स्ट्राईकची आठवण आणि 'पाक डिफेन्स'चे 'ते' ट्विट

26 Feb 2021 12:30:28

1 _1  H x W: 0




नवी दिल्ली : १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला. यात एकूण ४५ भारतीय सुरक्षा रक्षक हुतात्मा झाले. पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. संपूर्ण देश हळहळला होता. भारताने याचे जशाच तसे उत्तर द्यावे, अशी मागणी सर्व स्तरातून झाली होती.
 

 
भारतीय वायुसेनेने रणनिती आखून पाकिस्तानच्या नाकावर टीच्चून तिथल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालूनच त्या ४५ हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याच रात्री पाकिस्तानच्या ट्विटर अकाऊंटद्वारे ट्विट करण्यात आले होते. योगायोगाने हाच दिवस भारताने एअर स्ट्राईकसाठी निवडला होता. २६ फेब्रुवारी २०१९ ची मध्यरात्र. या ट्विटमध्ये म्हटले होते. निःश्चिंत झोपा कारण पाकिस्तानी एअर फोर्स जागी आहे. अर्थात हे ट्विटर अकाऊंट अधिकृत नव्हते. मात्र, या ट्विटवरून भारतीय नेटीझन्सनी नेहमीप्रमाणे पाकिस्तानची खिल्ली उडवली होती. ज्यावेळी पाकिस्तानचा एअर स्ट्राईक झाला त्याच रात्री नेमके हे ट्विट करण्यात आले होते.




1 PAKISTAN_1  H
Powered By Sangraha 9.0