सर्वोच्च न्यायालयावरील ताण वाढविण्यास न्यायमूर्तीही जबाबदार न्यायमूर्ती एम. आर. शाह यांची टिप्पणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2021
Total Views |

DYC_1  H x W: 0

सर्वोच्च न्यायालयावरील ताण वाढविण्यास न्यायमूर्तीही जबाबदार

न्यायमूर्ती एम. आर. शाह यांची टिप्पणी


नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयावरील ताण वाढविण्यास बऱ्याचदा सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीही जबाबदार असतात, अशी महत्वाची टिप्पणी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड आणि न्या. एम. आर. शाह यांनी गुरुवारी एका सुनावणीदरम्यान केली.

 

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड आणि न्या, एम. आर. शाह यांचे खंडपीठ २००३ सालच्या खटल्यावर सुनावणी करीत होते. भाडेकरूचा ११ महिन्यांचा करार संपुष्टात आल्यानंतर त्यास जागा रिकामी करण्याचा आदेश देण्यासंदर्भातील २००३ सालच्या अवमान याचिकेवर ही सुनावणी सुरू होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयातर्फे सुनावणीसाठी घेण्यात येणाऱ्या अशा खटल्यांमुळे न्यायलयावरी ताण वाढतो, असे न्या. चंद्रचुड यांनी सांगितलले. न्या. एम. आर. शाह यांनी त्यांच्या टिप्पणीस दुजोरा दिला. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयावरील ताण वाढण्यास बऱ्याचदा आम्ही न्यायमूर्ती जबाबदार असतो, असे मला वाटतो. त्यामुळे आता न्यायव्यवस्थेवरील ताणासंदर्भात खुद्द न्यायमूर्तींनीच टिप्पणी केल्याने त्यास विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

 

सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांविषयी नेहमीच बोलले जाते. वर्षानुवर्षे खटले रेंगाळत असल्याने न्यायव्यवस्थेवरही ताण निर्माण झाला आहे. आकडेवारीनुसार १ फेब्रुवारी, २०२० रोजीपर्यंत सर्वोच्च न्यायालयात ६६ हजार ०७२ खटले प्रलंबित आहेत. त्यापैकी ४७ हजार १३६ दाखल करुन घेण्यासंदर्भातील प्रकरणे आहेत तर १८ हजार ९३६ नियमित सुनावणीचे खटले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर ४४३ खटले प्रलंबित आहेत. त्यापैकी ४७ मुख्य खटले आहेत तर ३९६ जोडयाचिका आहेत.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@