मोठी बातमी! नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

    दिनांक  25-Feb-2021 16:51:33
|

nirav modi_1  H
 
 
 

१३ हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्याचा सुत्रधार भारतात येणार

 
 
लंडन : पीएनबी बँक गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी फरार नीरव मोदीची याचिका लंडन न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. भारताची न्यायपालिका निःपक्ष आहे, असे म्हणत त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला आहे. वेस्टमिंस्टर मेजिस्ट्रेट कोर्टाचे न्यायाधीश जज सॅम्युअल गोजी यांनी स्पष्ट केले की नीरव मोदीने भारतातर्फे विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत, त्यासाठी तो बंधनकारक आहे, असेही म्हटले. नीरव मोदीने आपल्या मानसिक आरोग्याचे कारण देत दिलासा देण्यासाठी याचिका दाखल केली होती.
 
 
 
ब्रिटीश न्यायालयाने याचीही स्पष्टता केली ही, साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न झाला. भारतातील तुरुंगांची स्थिती पाहता असा प्रकार होणार नाही यासाठी संतुष्ट असल्याचे न्यायालय म्हणाले. १३ हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण करण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्यावेळी त्याला न्यायालयाने भारतात पाठण्यासाठी २५ फेब्रुवारी २०२१ ही तारीख निश्चित केली होती.
 
 
 
भारतीय तपास यंत्रणांचे लंडनमध्ये प्रतिनिधीत्व करणारी संस्था क्राऊन प्रॉसिक्युशन सर्विसतर्फे (सीपीएस) ब्रिटनच्या न्यायालयात एक वक्तव्य दिले आहे. नीरव मोदी एका गैरव्यवहारात सामील होता. त्यामुळे पीएनबी बँकेला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. सुनावणीवेळी नीरव मोदी एका व्हीडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे सहभागी झाला.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.