FIR दाखल नाही! राठोडने पुरावे गायब केले तर काय कराल? : निलेश राणे

25 Feb 2021 13:26:18

Nilesh Rane_1  
 
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सर्व स्तरांवरून टीका होत आहे. त्यातच, त्यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनावरून आता भाजप नेत्यांनी त्यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवरदेखील चहूबाजूंनी टीका सुरु केली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत म्हणाले की, "वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनाम घेण्याचे धाडस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही." तसेच, "अद्याप एफआयआर दाखल केलेली नाही. संजय राठोड यांनी पुरावेच गायब केले तर काय कराल?" असा सवालदेखील त्यांनी विचारला आहे.
 
 
 
 
 
 
भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट केले की, "ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवत आहेत. सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तिप्रदर्शन करतो, कॅबिनेट मीटिंगमध्ये बसतो, पण तरीही त्याचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यामध्ये नाही. नंतर मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की मी मर्द आहे." अशी खोचक टीका त्यांनी केली.
 
 
 
 
 
 
पुढे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वानवडी पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर पोलिसांकडून मिळालेल्या वाग्नुकीवारही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, "पूजा चव्हाण हत्या प्रकरणामध्ये चित्राताई वाघ वानवडी पोलीस स्टेशनला जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. पोलिसांनी त्यांना दिलेली वागणूक बघून आश्चर्य वाटले. एक गुन्हेगार मंत्र्याला वाचवण्यासाठी पोलीस किती तत्पर आहेत यावरून लक्षात आले."
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0