पियाजिओकडून कार्गो व पॅसेंजर विभागातील इलेक्ट्रिक वाहनांची आपे इलेक्ट्रिक एफएक्‍स श्रेणी सादर

    दिनांक  24-Feb-2021 18:34:50
|

Piaggio Introduces Auto Fमुंबई: पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि. (पीव्‍हीपीएल) ही दुचाकी विभागातील युरोपियन प्रमुख कंपनी इटायलियन पियाजिओ ग्रुपची भारताच्‍या आघाडीच्‍या लघु व्‍यावसायिक वाहनांच्‍या उत्‍पादक कंपनीने आज कार्गो व पॅसेंजर विभागांमध्‍ये इलेक्ट्रिक वाहनांची एफएक्‍स श्रेणी (फिक्‍स्‍ड बॅटरी) सादर केली.नवीन आपे ई-एक्‍स्‍ट्रा एफएक्स ही ९.५ किलोवॅट पॉवर आऊटपुट असलेली विभागातील सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक कार्गो आहे. ही गाडी ६ फूट लांब कार्गो डेकसह प्रमाणित पूर्णत: मेटल बॉडी रचनेसह येते आणि ती डिलिव्‍हरी व्‍हॅन, कचरा गोळा करणे यासारख्‍या उपयोजनांसाठी सानुकूल देखील आहे. शिवाय ब्‍ल्‍यू व्हिजन हेडलॅम्‍प्‍स, ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन, हिल होल्‍ड असिस्‍ट, रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग, ड्युअल टोन सीट्स, आकर्षक रंग व ग्राफिक्‍स, मल्‍टी-इन्‍फॉर्मेशन इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, बूस्‍ट मोड इत्यादी. एफएक्‍स फिक्‍स्‍ड बॅटरी श्रेणीमध्‍ये घरी व कार्यालयामध्‍ये सोईस्‍करपणे चार्जिंग करता येईल अशी वैशिष्‍ट्ये आहेत.
पियाजिओ इंडिया प्रा. लि.चे कार्यकारी उपाध्‍यक्ष व व्‍यावसायिक वाहन व्‍यवसायाचे प्रमुख श्री. साजू नायर म्‍हणाले, ''आम्‍ही उद्योगक्षेत्रातील ट्रेण्‍ड्स, ग्राहक महत्त्वाकांक्षा व विभागातील गरजांचा सखोल अभ्‍यास केल्‍यानंतर एफएक्‍स श्रेणी सादर करत आहोत. एफएक्‍स श्रेणी आमच्‍या ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करेल, वातावरणाचे संरक्षण करेल आणि ''आपेने अवलंबलेल्‍या इलेक्ट्रिकसह भारताने देखील अवलंबले इलेक्ट्रिक'' या संकल्‍पनेसह उद्योगक्षेत्रामध्‍ये खरा क्रांतिकारी बदल घडवून आणेल.''
ग्राहकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, कंपनी आकर्षक सर्विस सोल्‍यूशन्‍स देत आहेत. वेईकल्स ३ वर्षे/ १ लाख किलोमीटर ''सुपर वॉरण्‍टी''सह येतात व याव्‍यतिरिक्‍त सर्व ग्राहकांना सुरूवातीची ऑफर म्‍हणून ३ वर्षे फ्री मेन्‍टेनन्‍स पॅकेज देत आहेत. पियाजिओ आय-कनेक्‍ट टेलिमॅटिक्‍स सोल्‍यूशन ग्राहकांसाठी, तसेच पीव्‍हीपीएल सर्विस उपक्रमांसाठी रिअल टाइम वेईकल डेटा ट्रॅकिंग सेवादेखील देते.'' आपे इलेक्ट्रिक एफएक्‍स वेईकल्‍स www.buyape.in या वेबसाइटवर ऑनलाइन किंवा टोल फ्री क्रमांक १८००-१२०-७५२० वर संपर्क साधन बुक करता येऊ शकतात.


डिलरशिप चौकशीसाठी संपर्क क्रमांक- +९१-९८२३७९०८७६
ई-मेल आयडी- [email protected]

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.