"मेट्रो प्रकल्प पुरुष ब्राह्मणवादी, हिंदू वर्चस्ववादी पुरुषप्रधान आहे"

    दिनांक  23-Feb-2021 15:01:53
|

metro man_1  Hई श्रीधरन यांच्या भाजप प्रवेशानंतर आल्यानंतर विरोधकांनी केली टीकांची सुरुवात


नवी दिल्ली: मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे ई श्रीधरन हे भाजपमध्ये सामील झाले त्यामुळे आता विरोधक त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करताना दिसत आहेत. केवळ त्यांच्या पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरून असा वाद सुरु झाला असेल, असा अंदाज काही स्तरातून व्यक्त होतोय. कारण श्रीधरन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असणाऱ्या मेट्रोच्या रंग व आकारावरून आता भलताच वाद उभा राहताना दिसतोय.
 
 
 
 
केवळ विरोधासाठी विरोध करणाऱ्या तथाकथित उदारमतवादी महाभागांच्या मते, मेट्रोचा आकार हा पुरुषाच्या खूप लांब जननेंद्रियासारखा आहे. आणि असे विधान करणाऱ्यांच्या यादीत अगदी हृदयरोग तज्ञांचादेखील समावेश आहे. कोच्चिस्थित मेडिकल ट्रस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर वरुण याचं असं म्हणणं आहे की, 'श्रीधरन हे सर्व विशेषाधिकार असणार्‍या हिंदू वर्चस्ववादाचे रूप आहेत; त्यामुळे मेट्रोचा हा प्रकल्प रद्द करा.'
 
 
 
 
भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश घेतल्यानंतर मेट्रो मॅन श्रीधरन यांनी सांगितले की ते शालेय काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. आणि त्यांची जीवनमूल्ये समृद्ध करण्यात संघाने सर्वात महत्वाची भूमिका बजावली आहे. कदाचित याच बाबींमुळे त्यांच्यावर ही टीका होत असल्याचे देखील अनेक नेटकऱ्यांनी थेट समाज माध्यमांवर म्हटले आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.