तिघाडी सरकार ४० टक्क्याच्या 'टॅक्स' अत्याचारतून सुट देईना : प्रकाश बेलवडे

23 Feb 2021 12:22:15

Petrol_1  H x W
मुंबई : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उत्पन्नात घट झालेली असताना पेट्रोलने अनेक राज्यांमध्ये नव्वदी तर काही राज्यांमध्ये शंभरी पार केली आहे. अशामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान आणि मेघालय या चार राज्यांनी राज्य सरकार घेत असलेला वॅट (VAT) कमी करत पेट्रोल - डिझेलचे भाव कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात हा निर्णय कधी घेणार असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.
 
 
 
 
 
 
 
"चार राज्यांत त्यांनी आपले कर कमी करून नागरिकांचा खिसा सांभाळला. पण, आमचे तिघाडी सरकार ४० टक्क्याच्या 'टॅक्स' अत्याचारतून सुट देईना." असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राज्य सचिव प्रकाश बेलवडे - पाटील यांनी केला आहे. पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान आणि मेघालयने पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करण्याची घोषणा केली. राजस्थान सरकारने मागील महिन्यात वॅट दर ३८ टक्क्यांवरुन ३६ टक्क्यांवर घटवला होता. त्यानंतर आता पश्चिम बंगाल सरकारने पेट्रोल-डिजलच्या वॅटमध्ये १ रुपयांची कपात केली आहे. तसेच, आसाम सरकारने कोविडसाठी घेण्यात येणारा ५ रुपयांचा कर रद्द केला आहे. त्यामुळे आता इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही सरकार असा काही निर्णय घेणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0