वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवी गडावर देवीचं दर्शन घेणार

    दिनांक  23-Feb-2021 10:53:10
|

sanjay rathod_1 &nbs राठोड काय बोलणार? याकडे महाराष्ट्राचे लक्षवाशिम: पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आरोपसत्राला सामोरे गेल्यानंतर गायब झालेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवी गडावर जाणार आहेत. राठोड यांच्या घराबाहेर गाड्यांचा ताफा उभा ठेवण्यात आलेला आहे. इतके दिवस अक्षरशः गायब असणारे राठोड आज सबंध प्रकाराबाबत काय उत्तरं देतील, याकडे संपूर्ण महाराष्ट्रचं लक्ष लागून राहीलेलं आहे.
 
 
 
 
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड हे नेमकी काय भूमिका मांडतात याकडे राजकीय वर्तुळाचंसुद्धा लक्ष लागलं आहे. संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज, जगदंबा मातेचं दर्शन घेतल्यावर ते दुपारी १ वाजता दारव्हा तालुक्यातील धामनगाव देव इथल्या श्रीक्षेत्र मुंगसाजी महाराज संस्थानकडे निघतील. दुपारी अडीच वाजता मुंगसाजी महाराज देवस्थानात दर्शन घेतल्यावर ते साडेचार वाजता यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील. त्यानंतर यवतमाळ निवासस्थानी थांबतील.
 
 
 
 
मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून ७ फेब्रुवारीला मृत्यू झाला होता. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. शिवाय आज सकाळपासूनच पूजा चव्हाण आणि राठोड यांचे काही फोटो समाज माध्यमांवर प्रसिद्ध होत आहेत. पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिपदेखील समोर आलेली आहे. आणि या तब्बल १२ ऑडिओ क्लिपमुळे वनमंत्री संजय राठोड यांचेही नाव यामध्ये उघड झाले होते.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.