विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीसांचा कारवाईचा दंडुका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2021
Total Views |

mask _1  H x W:



मुंबई : कोरोना आकडेवारी वाढू लागल्यानंतर आता राज्य सरकारही अधिक सर्तक झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसाठी आठ दिवसांचा अल्टीमेटम लावल्यामुळे पुन्हा एकदा मास्क न वापरणाऱ्यांवर पूर्वीपेक्षा कडक कारवाई केली जाणार आहे. चौकाचौकात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार आता मुंबई पोलीसांनाही देण्यात आले आहेत. पोलीसांनीही आता पुन्हा एकदा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कंबर कसली आहे.
 
 
 
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. ते म्हणतात, "मुंबईकरांनो! विनामास्क फिरणारे, सिटबेल्ट किंवा हेल्मेट न लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार मुंबई पोलीसांना देण्यात आले आहेत. आपल्या आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा! तुमची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे.
 
 
किती रुपये होणार दंड ?
 
विना हेल्मेट : पाचशे रुपये
 
 
विना सिटबेल्ट : पाचशे रुपये
 
 
विना मास्क : दोनशे रुपये




@@AUTHORINFO_V1@@